Mahavitaran : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ मधून २० लाखांची वार्षिक बचत

0
Mahavitaran : महावितरणच्या 'ग्राे-ग्रीन'मधून २० लाखांची वार्षिक बचत
Mahavitaran : महावितरणच्या 'ग्राे-ग्रीन'मधून २० लाखांची वार्षिक बचत

Mahavitaran : नगर : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महावितरणकडून (Mahavitaran) ‘गो-ग्रीन’ योजना सुरू करण्यात आली आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ (Go-Green) योजनेंतर्गत वीजबिलांसाठी (electricity bill) छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ई-मेल व एसएमएसचा (Email and SMS) पर्याय निवडणाऱ्या नगर परिमंडलातील पर्यावरणस्नेही १६ हजारांवर २० लाखांची वार्षिक बचत होतेय.

Mahavitaran : महावितरणच्या 'ग्राे-ग्रीन'मधून २० लाखांची वार्षिक बचत
Mahavitaran : महावितरणच्या ‘ग्राे-ग्रीन’मधून २० लाखांची वार्षिक बचत

हे देखील वाचा : आरक्षणाचा तिढा, उपाय काय?; पाेपटराव पवारांनी सांगितला ताेडगा

पर्यावरण रक्षणासाठी महावितरणने महत्त्वाचे पाऊल टाकले. नगर मंडळातील १६ हजार ४५२ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी यासाठी पुढाकार घेतला. छापील वीजबिल नाकारून कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ऑनलाईन सेवेच्या पर्यायाचा वापर करीत महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये या प्रमाणे एकूण ग्राहकांची १९ लाख ७४ हजार २४० रुपये इतकी वार्षिक बचत होत आहे. वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची सूट देण्यात येत आहे.

नक्की वाचा : छगन भुजबळ पनवती’; मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका

सद्यस्थितीत नगर शहर विभागात ६ हजार ३१४, नगर ग्रामीण विभागात २ हजार ७, कर्जत विभागात १ हजार ३७९, संगमनेर विभागात ४ हजार २८८ व श्रीरामपूर विभागात २ हजार ४६४ अशाप्रकारे एकूण नगर मंडळात १६ हजार ४५२ वीज ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. यात वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रती बिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलामध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा वीज बिल प्राप्त होत असल्याने ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट्सह ते तत्काळ घरबसल्या ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. सोबतच ऑनलाईन वीजबिल भरल्यास ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत-जास्त ५०० रुपये पर्यंत सूट मिळते.

वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दर महा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिल यासह मागील अकरा महिन्याचे असे एकूण बारा महिन्याचे वीज बिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते कधीही डाउनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. महावितरण ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाईल अँपद्वारे किंवा संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंक वर जाऊन करावी. याबाबतची अधिक www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी पर्यावरणाच्या समृद्धीसाठी आणि वीज खर्च कमी करण्यासाठी गो-ग्रीन या पर्यायाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here