Mahavitaran : महावितरणने जिल्ह्यात बसविले ७ हजार ६३० सौरपंप 

Mahavitaran : महावितरणने जिल्ह्यात बसविले ७ हजार ६३० सौरपंप  

0
Mahavitaran : महावितरणने जिल्ह्यात बसविले ७ हजार ६३० सौरपंप  
Mahavitaran : महावितरणने जिल्ह्यात बसविले ७ हजार ६३० सौरपंप  

Mahavitaran : नगर : केवळ १० टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स (Solar Panels) व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकर्‍यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या (Saur Krushi Pump Yojana) अंमलबजावणीत महावितरणने अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात ७ हजार ६३० पंप बसविले आहेत. महावितरण (Mahavitaran) विभागाने ही माहिती दिली.

नक्की वाचा : मोठी बातमी!अभिनेता अल्लू अर्जुनला अटक  

केंद्र सरकारकडून ३० % तर राज्य सरकारकडून ६० % अनुदान

राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेत शेतकर्‍यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ १० टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपसह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकर्‍यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकर्‍यांची पेड पेंडिंगची समस्या सोडविण्यासाठी ही योजना राबविण्यासाठी आग्रह आहे. शेतकर्‍यांना सिंचनाच्या बाबतीत स्वतंत्र करणारी आणि त्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करणारी ही योजना प्राधान्याने राबविण्याची सूचना त्यांनी केली आहे. सौर कृषी पंप बसविण्यामध्ये राज्य देशात आघाडी घेतली असून त्याबद्दल नुकताच केंद्र सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत राज्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

अवश्य वाचा : तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू  

राज्यात ११ डिसेंबरपर्यंत एक लाख ४६२सौर कृषी पंप (Mahavitaran)

राज्यात ११ डिसेंबरपर्यंत एकूण एक लाख ४६२सौर कृषी पंप महावितरणकडून बसविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पंप जालना जिल्ह्यात १५ हजार ९४० बसविण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ बीडमध्ये १४ हजार ७०५, परभणी जिल्ह्यात ९ हजार ३३४, अहिल्यानगर जिल्ह्यात ७ हजार ६३०, छत्रपती संभाजीनगर सहा हजार २६७ आणि हिंगोली सहा हजार १४सौरपंप बसविण्यात आले आहेत. राज्य सरकारने राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. दहा लाखापेक्षा जास्त पंप बसविण्यात येणार असल्याने कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणार्‍या सर्व शेतकर्‍यांचा पेड पेंडिंगचा प्रश्‍न सुटणार आहे.
दिवसा वीज पुरवठ्याची मागणी पूर्ण सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकर्‍यांना कृषी पंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकर्‍यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्याची शेतकर्‍यांची मागणी पूर्ण होत आहे.