Mahavitaran : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

Mahavitaran : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

0
Mahavitaran : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा
Mahavitaran : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

Mahavitaran : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर परिसरात २८ जानेवारीपासून पुन्हा रात्रीचा वीजपुरवठा (Power supply) सुरू करण्यात आला आहे. बिबट (Leopard) प्रवण क्षेत्रात शेतकऱ्यांच्या जीवाला धोका असताना प्रशासनाने दिवसा वीज देण्याचा निर्णय फिरवल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिवसा वीज पुरवठा सुरु करावा अनाथा आंदोलन (protest) करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

नक्की वाचा: केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? निर्मला सीतारमण यांनी काय सांगितलं?

दिवसा पाणी भरतानाही भीती

दोन महिन्यांपूर्वी तालुक्यात बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. निंबळक आणि खारे कर्जुने परिसरात चिमुकल्यांवर झालेले हल्ले आणि पाळीव प्राण्यांच्या शिकारीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, हा निर्णय केवळ महिना-दोन महिन्यांपुरताच मर्यादित राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या ज्वारी आणि चारा पिकांची उंची वाढलेली आहे, डोंगराच्या कडेला शेतजमीन असल्याने दिवसा पाणी भरतानाही भीती वाटते. रात्रीची वीज असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून शेतात जावे लागते. प्रशासनाने याची दखल घेऊन दिवसा वीज द्यावी अशी मागणी प्रशांत कदम, गणेश लटपटे यांनी केली आहे.

अवश्य वाचा: अहिल्यानगरचा सर्पमित्र आकाश जाधव गांजा तस्करीत जेरबंद; पुन्हा एक रिलस्टार गुन्हेगार?

परिसरात अद्यापही बिबट्यांचा वावर (Mahavitaran)

सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा आणि चारा पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अशा वेळी महावितरणने २८ जानेवारीपासून विजेचे वेळापत्रक बदलून पुन्हा रात्रीचा पुरवठा सुरूकेला आहे. परिसरात बिबट्यांचा वावर अद्यापही असल्याने रात्री पाणी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.