Mahavitaran : विजेचा दर मर्यादित राहणार; महावितरणचा ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीचा करार

Mahavitaran : विजेचा दर मर्यादित राहणार; महावितरणचा ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीचा करार

0
Mahavitaran

Mahavitaran : नगर : राज्यातील वाढती कमाल वीज मागणी पूर्ण करण्यासाठी ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीसाठी महावितरणने (Mahavitaran) बुधवारी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सतलज जल विद्युत निगम लिमिटेड तसेच नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन यांच्यासोबत दोन करार केले. वीज खरेदीचा दर माफक असल्याने वीज (Electricity) खरेदी खर्चात बचत होणे अपेक्षित असून त्यामुळे विजेचा दर मर्यादित ठेवण्यास मदत होईल, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे देखील वाचा : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये ;अजित पवारांचा इशारा

अधिकाऱ्यांची उपस्थिती (Mahavitaran)

यावेळी अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.

नक्की वाचा : भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी

देवेंद्र फडणवीस म्हणाले (Mahavitaran)


”महावितरणतर्फे ग्रीन एनर्जीवर भर दिला जात आहे. ही चांगली बाब असून पर्यावरण रक्षणासोबतच ही स्वस्त ऊर्जा महाराष्ट्राच्या ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. देशातील बॅटरी स्टोरेज आधारित ग्रीन एनर्जीचा वापर पीकिंग अवर्समध्ये म्हणजे कमाल मागणीच्या वेळी होणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा उपलब्ध नसतानाच्या कालावधीत महाग वीज खरेदीची आवश्यकता राहणार नाही. या करारांमुळे नवीनीकरणीय ऊर्जा बंधनाचे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होईल. एकंदरित वीज खरेदी खर्चात बचत होऊन ग्राहकांना भविष्यात अधिक किफायतशीर दरात वीज मिळेल, ही चांगली बाब आहे.

महावितरणचे संचालक योगेश गडकरी आणि सतलज जल विद्युत निगम लिमिटेडचे कार्यकारी संचालक पवन वर्मा यांनी १८०० मेगावॅट नविनीकरणीय ऊर्जेसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे १८०० मेगावॅटची अक्षय ऊर्जेवर आधारित स्टोरेज क्षमता निर्माण होणार आहे. ती कोणत्याही वीज वितरण कंपनीद्वारे आजवर करार झालेली संपूर्ण देशात सर्वाधिक क्षमता आहे. 


महावितरणची विजेची मागणी सुमारे २५,४१० मेगावॅट आहे. वीज पुरवठ्यासाठी करार झालेली क्षमता आता ४१,५७० मेगावॅटवर पोहोचली आहे. त्यामध्ये अक्षय ऊर्जेसाठी करार झालेली क्षमता १४,५५१ मेगावॅट आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणे आणि उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करणे, यासाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या कल्पक योजनेअंतर्गत महावितरणची नवीकरणीय ऊर्जा क्षमता ९,१५५ मेगावॅटने वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here