Mahavitaran : वीज चाेरांवर महावितरणची धडक कारवाई

Mahavitaran : वीज चाेरांवर महावितरणची धडक कारवाई

0
Mahavitaran
Mahavitaran : वीज चाेरांवर महावितरणची धडक कारवाई

Mahavitaran : नगर : अनधिकृत वीज (Electricity) वापराविरोधात महावितरणने (Mahavitaran) कारवाईचा बडगा उचलत नगर जिल्ह्यात दाेन काेटींची वीजचाेरी पकडली आहे. महावितरणच्या कोकण परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या १२ विविध भरारी पथकांनी नगर जिल्ह्यात व मुख्यतः शेगाव उपविभागातील परिसरात २२ ते २५ एप्रिल रोजी सलग तीन दिवस सातत्याने वीजचोरांच्या विरोधात मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये एकूण अंदाजित दोन कोटींची वीज चोरी उघडकीस आणली. या कारवाईमध्ये (Action) जिल्ह्यातील दोन ऑईल मिल कंपन्यांची सुद्धा वीज चोरी उघडकीस आली आहे.

हे देखील वाचा: आरक्षणाच्या विरोधकांना पूर्ण ताकदीने पाडा; मनोज जरांगे पाटलांचे मराठ्यांना आवाहन

भरारी पथकांकडून शोध मोहीम (Mahavitaran)

जिल्ह्यात काही भागात वीज चोरी होत असल्याची माहिती दक्षता आणि सुरक्षा अंमलबजावणी विभागाला प्राप्त झाली होती. याची तपासणी करण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक विनायक नराळे आणि उपसंचालक सुमित कुमार यांनी सहायक संचालक बबन साठे यांच्या नेतृत्वाखाली १२ तपासणी पथकांची स्थापना केली. या तपासणी तथा भरारी पथकाने मोहीम राबवित जिल्ह्यातील लघुदाब वीज ग्राहकांच्या विद्युत मीटरची तपासणी करून वीज चोरी उघडकीस आणली. यामध्ये महावितरणच्या विविध भरारी पथकाकडून संशयास्पद २५० विद्युत ग्राहकांच्या वीज मीटर संचाची व परिसराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १६३ ग्राहकांकडे वीज चोरी, तर ६ ग्राहकांकडे अनियमितता उघडकीस आली. या मोहिमेत जिल्ह्यातील गौरी ऑईल मिल आणि शिवकृपा ऑईल मिल या दोन ऑईल मिल कंपन्यांनी वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. या ग्राहकांना देय असलेले निर्धारण व तडजोड रकमेची देयके देण्यात आली असून त्यांनी निर्धारित मुदतीत न भरल्यास पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Mahavitaran
Mahavitaran

नक्की वाचा: अबब! नगर लाेकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाच नावाचे दाेन उमेदवार

मीटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी (Mahavitaran)

वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणाऱ्यांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार, तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसऱ्या कारणासाठी बेकायदेशीर वीज वापर करीत असल्याचे आढळून आलेल्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येते. वीज देयक न भरणाऱ्या ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला, अशा ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर वीज वापर करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येते. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन वेळोवेळी केले आहे. वीज चोरी करणे हा दंडनीय अपराध आहे. गुन्हा सिद्ध झाला तर कठोर कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. आपल्या परिसरात वीज चोरी होत असल्यास महावितरणच्या जवळील कार्यालयात याची माहिती द्यावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येते, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Electricity bill

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here