Mahavitaran : कोपरगाव: गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरातील वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे (Power supply) नागरिक चांगलेच वैतागले आहेत. याचा फटका विद्यार्थ्यांसह नागरिकांना बसत, असल्याने महावितरणबाबत (Mahavitaran) तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठयाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. मनसे शहर अध्यक्ष सतिश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिकांच्या वतीने महावितरण कार्यालयाच्या गेटवर खळखट्याक आंदोलन (Movement) करण्यात आले. यावेळी मनसेच्या वतीने विजेच्या लपंडावामुळे घरातील नादुरुस्त झालेले टीव्ही, ट्यूबलाइट व इलेक्ट्रिकल साहित्य रस्त्यावर आपटून मोडतोड करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
नक्की वाचा: मोहरम सणानिमित्त हे रस्ते राहणार ‘नो व्हेईकल झोन
वीज वितरण कंपनी विरोधात घोषणाबाजी (Mahavitaran)
यावेळी मनसेच्या वतीने वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. आज फक्त गेटवर खळखट्याक आंदोलन करण्यात आले असून आठ दिवसात शहरातील विजेचा लपंडाव बंद न झाल्यास महावितरण कार्यालयात जाऊन खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसे सैनिकांच्या वतीने देण्यात आला. यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष अनिल गाडे, हिंदु सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे, तालुका संघटक नवनाथ मोहिते, कामगार सेना तालुका अध्यक्ष संजय जाधव, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष अनिल सुपेकर, अजिंक्य काकडे, सुरेश सुपेकर, अभि पवार, किरण आवारे, रोहन पवार, संजू सुपेकर, बल्ली पाटोळे, प्रतिक त्रीभुवन आदींसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.