Mahavitaran : सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन

Mahavitaran : सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन

0
Mahavitaran : सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन

Mahavitaran : नगर : येत्या गणेशोत्सवात (Ganeshotsav) सार्वजनिक मंडळांना विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीज (Electricity) जोडण्या व तत्पर वीजसेवा देण्यासाठी नाशिक परिमंडलातील महावितरणची यंत्रणा सज्ज आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी घरगुती दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात (Accident) टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने (Mahavitaran) केले आहे. गणेश मंडळांना सुरक्षा ठेवीची (अनामत) रक्कम परत करण्याची कार्यवाही तातडीने करा, असे निर्देशही नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

तात्पुरती वीजजोडणी देण्याची जलदगतीने कार्यवाही

गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्याची कार्यवाही जलदगतीने झाली पाहिजे. ऑनलाइन अर्ज भरण्यासह इतर काही अडचणी येत असल्यास मंडळांना त्यासाठी सहकार्य करावे. जेथून नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे, अशा सर्व रोहित्रांची व मिरवणुकांच्या मार्गावरील वीजयंत्रणेची पाहणी करावी व आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्ती करावी. तसेच गणेश मंडळांच्या सुरक्षा ठेवीची रक्कम बँक खात्यात परत करण्याची कार्यवाही गणेशोत्सवानंतर लवकर पूर्ण करावी, यामध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घावी, असेही मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी निर्देशित केले आहे.

अवश्य वाचा : वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणीबाबतचे वृत्त चुकीचे; जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार (Mahavitaran)

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. मंडपातील वीज यंत्रणेची अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो. त्यातून विद्युत अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत, याची दैनंदिन तपासणी करावी. हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी गांभिर्याने दखल घेऊन वीज सुरक्षेबाबत उपाय योजनांमध्ये तडजोड करू नये.