Mahavitaran : वीजबिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित हाेणार; महावितरणचा इशारा

0
Mahavitaran

Mahavitaran : नगर : ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल (Electricity bill) भरणा केंद्र सुरू ठेवण्यासोबतच थकीत वीजबिल वसुलीसाठीची कारवाई सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी वीज (Electricity) पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी आपल्या विदुयत बिलाचा भरणा वेळेत करावा, असे आवाहन महावितरण (Mahavitaran) विभागाकडून करण्यात आले आहे.

नक्की वाचा: पीएम किसानचा १८ वा हफ्ता ‘या’दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

साप्ताहिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु

नगर जिल्ह्यात ३ लाख ग्राहकांकडे ३७७ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असून थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शनिवार व रविवारी २८ व २९ सप्टेंबर २०२४ या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु असणार आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार असून या सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

अवश्य वाचा: कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने नेमला कन्सल्टंट : रोहित पवार

थकबाकीदारांविरुद्ध वीजपुरवठा खंडितची कारवाई सुरु (Mahavitaran)

नगर मंडळात २ लाख ५७ हजार घरगुती ग्राहकांकडे ३८ कोटी ७८ लाख रुपये, २५ हजार वाणिज्यीक ग्राहकांकडे १० कोटी ५० लाख, ४ हजार ४५९ औद्योगिक ग्राहकांकडे ६ कोटी ५२ लाख, ३७४७ पथदिवे ग्राहकांकडे २१४ कोटी, १७१० पाणीपुरवठा ग्राहकांकडे १०२ कोटी, ५२५६ सार्वजनिक सेवा ग्राहकांकडे ५ कोटी आणि इतर १२१७ ग्राहकांकडे ४९ लाख रुपये थकबाकी आहे. अशी एकूण जिल्ह्यात २ लाख ९९ हजार २३७ ग्राहकांकडे ३७७ कोटी थकबाकी असून थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे.

 ग्राहकांच्या सोयीसाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँप वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते, या डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या वीजबिल भरता येईल. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.