Mahayuti : श्रीरामपुरातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटेना

Mahayuti : श्रीरामपुरातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटेना

0
Assembly Elections
Mahayuti : श्रीरामपुरातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटेना

Mahayuti : श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात (Srirampur Assembly Constituency) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही. स्थानिक उमेदवार म्हणून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती हाती असून माजी खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) हेही मुंबईत तळ ठोकून आहेत.

नक्की वाचा: माझ्यावर हल्‍ला करण्‍याचा कट : सुजय विखे पाटील

महायुतीकडून उमेदवार कोण यावर चर्चा सुरू

आज शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यात श्रीरामपूरच्या उमेदवाराचे नाव जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर तालुक्यात महायुतीकडून आता उमेदवार कोण असेल यावर चर्चा सुरू झाल्या. सुरुवातीला काँग्रेसने तिकीट नाकारलेले आमदार लहू कानडे यांचे नाव शिंदे शिवसेनेकडून तिकिटासाठी चर्चिले जाऊ लागले. परंतु आज या चर्चांना पूर्णविराम मिळून कानडे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे निश्चित झाले.

माजी खासदार सदाशिवराव लोखंडेंचे पुत्र प्रमुख इच्छुक (Mahayuti)

महायुतीकडून माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे प्रमुख इच्छुक आहेत. त्याचबरोबर जितेंद्र तोरणे, नितीन दिनकर, नितीन उदमले हेही उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. वाढत्या इच्छुकांच्या संख्येमुळे पक्षश्रेष्ठींच्या पुढेही अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे श्रीरामपूर महायुतीच्या जागेचा तिढा सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. आज हा तिढा सुटतो की आणखी काही नवीन ट्विस्ट या मतदारसंघात निर्माण होतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.