Mahayuti : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा दणदणीत विजय; विखे ठरले किंगमेकर

Mahayuti : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा दणदणीत विजय; विखे ठरले किंगमेकर

0
Mahayuti : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा दणदणीत विजय; विखे ठरले किंगमेकर
Mahayuti : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा दणदणीत विजय; विखे ठरले किंगमेकर

Mahayuti: नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून सर्व १२ जागा विजयाच्या वल्गना करण्यात येत होत्या. मात्र, निवडणुकीच्या निकालाने महायुतीच्या (Mahayuti) पारड्यात १० तर महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ दोन जागा टाकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या पराभवाचा वचपा महायुतीने काढल्याची चर्चा आज दिवसभर होती. विखेंना विरोध करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), भाजपचे राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राणी लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

नक्की वाचा : दहावीच्या परीक्षेत गणित,विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी ‘इतके’ गुण आवश्यक

संगमनेरमध्ये जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विखे गट किंगमेकरच्या भूमिकेत दिसून आला. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विवेक कोल्हे यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आशुतोष काळेंचा विजय हा केवळ औपचारिकता होती. मतमोजणीनंतर यावर शिक्कामोर्तब झाला. अकोले मतदारसंघात डॉ. किरण लहामटे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामाला मतदारांनी कौल दिला. संगमनेरमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. मागील ४० वर्षांची बाळासाहेब थोरात यांची सत्ता गेली. हा जिल्ह्यातील सर्वात मोठा धक्कादायक निकाल होता. शिंदे गटाचे अमोल खताळ हे विजयी झाले. शिर्डी मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ता राखली. राहुरीमध्येही हिंदुत्वाचा मुद्दा तसेच लाडकी बहीण योजनेमुळे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना विजय खेचून आणता आला. त्यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा सहज पराभव केला.

Mahayuti : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा दणदणीत विजय; विखे ठरले किंगमेकर
Mahayuti : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा दणदणीत विजय; विखे ठरले किंगमेकर

अवश्य वाचा : राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार आहोत : आमदार बच्चू कडू

माजी मंत्री शंकरराव गडाख यांना पराभवाचा धक्का (Mahayuti)

श्रीरामपूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला हेमंत ओगले यांनी राखला. त्यांनी दोन माजी आमदारांचा पराभव करत हा विजय मिळवला. नेवासा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विजय मिळवला. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात तिरंगी लढत झाली. यात अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र, शेवट्या पाच फेऱ्यांनंतर भाजपच्या मोनिका राजळे यांनी विजय खेचून आणत विजयाची हॅटट्रिक केली.

नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत सामना झाला. यात अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक केली. यात ते सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिल्याने शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचा दारुण पराभव केला. पारनेर विधानसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना पराभवाचा धक्का बसला. यात अजित पवार गटाचे काशिनाथ दाते यांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयात विखे गटाचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे.

श्रीगोंदा मतदारसंघात तिरंगी लढत झाली. यात भाजपचे विक्रमसिंह पाचपुते यांनी सहज विजय मिळवला. यात शिवसेना गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे व अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांचा दारुण पराभव केला. श्रीगोंदा मतदारसंघाचा इतिहास पाहता या मतदारसंघात तिरंगी लढत झाल्यास ती पाचपुते कुटुंबाच्या पथ्यावर पडते. याचा प्रत्यय या निवडणुकीत पहायला मिळाला. कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे व रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढत झाली. यात रोहित पवार यांना निसटता विजय मिळाला.