नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधला (Mahayuti Government) महामंडळ वाटपाचा (Corporation Allocation) पेच सुटल्याची माहिती समोर आली आहे. संख्याबळानुसार,महायुतीत महामंडळांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे.या वाटपामध्ये भाजपच्या वाट्याला ४४, शिंदेंच्या शिवसेनेला ३३,तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला २३ असे महामंडळांच्या वाटपावर महायुतीत एकमत झाल्याचे ही समोर आले आहे.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींना दिलासा;अर्जाची छाननी थांबली, जुलैचे पैसे कधी मिळणार
आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न (Mahayuti Government)
नुकत्याच झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळाबाबत तीनही पक्षात हे सूत्र ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष महत्वाच्या महामंडळाकडे लागलं आहे. कारण सिडको आणि म्हाडासाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळाले आहे. परिणामी लवकरच पून्हा एकदा समन्वय समितीची बैठक होणार असून यात पुढील चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणूकीपूर्वी महामंडळ वाटप करून नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचा महायुतीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे.
अवश्य वाचा : सुवर्णपदक विजेता आदिश तनपुरे याने सांगितले यशाचे रहस्य…
नाराज आमदारांनी महामंडळ अध्यक्ष पदासाठी लॉबिंग (Mahayuti Government)
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महायुतीच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी राहू नये, यासाठी महायुती सक्रिय झाली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नाराज आमदारांनी आता महामंडळ अध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. या वाटपामुळे पक्षांतर्गत असंतोष कमी होऊन आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. महामंडळांवरील नियुक्त्या हा सत्तावाटपाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो, ज्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि आमदारांना योग्य स्थान मिळते. यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होण्यास मदत होईल.