नगर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election २०२४) काल (ता.२०) मतदान प्रक्रिया पार पडली. बहुतांश भागात चांगल्या प्रकारे मतदान झाले आहे. दरम्यान, मतदान झाल्यानंर एक्झिट पोल हाती आले आहेत. त्यातच २३ नोव्हेंबरला महायुतीच्या १६० सीट पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून निवडून येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी व्यक्त केला आहे. एक्झिट पोलनुसार (Exit Poll) महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नक्की वाचा : मतदान प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर
एक्झिट पोलचा अंदाज काय? (Maharashtra Vidhansabha)
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी २८८ मतदारसंघात आज काही अपवाद वगळता शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यात ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात ५८.२२ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे,लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधान सभेला मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला होता. तब्बल ४२ जागांवरुन भाजप महायुती केवळ १७ जागांवर आल्याची पाहायला मिळालं. पण, विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमधून महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो,असा अंदाज आहे.
अवश्य वाचा : यश शाहची तिसऱ्यांदा खेलो इंडिया व ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
महाविकास आघाडीला ‘इतक्या’ जागा मिळणार (Maharashtra Vidhansabha)
१० संस्थांचा सरासरी अंदाज पाहता महायुतीला १३९ ते १५६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीला ११९ ते १३६ जागांवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेगवगेळ्या संस्थांच्या सर्वेक्षणातून ही बेरीज काढण्यात आली आहे. चाणक्य स्ट्रॅटेजी, पोल डायरी, इलेक्ट्रोल एज, मॅट्रीझ, रिपब्लिक, न्यूज २४ पी-मार्क, एसएएस ग्रुप हैदराबाद, दैनिक भास्कर, लोकशाही आणि झी AI या १० संस्थांच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये, १० पैकी ७ संस्थांनी भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत दर्शवले आहे. तर,३ संस्थांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. तर, इतर व अपक्ष मिळून कमीत कमी २ ते जास्तीत जास्त २९ जागा मिळतील,असा अंदाज आहे.