Mahesh Jiwade | नगरच्या महेश जिवडे यांची केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवपदी नियुक्ती 

0

Mahesh Jiwade | नगर : पाथर्डी तालुक्यातील करंजी गावचे सुपुत्र महेश गोपीनाथ जिवडे (Mahesh Jiwade) यांची केंद्रीय ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांच्या स्वीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.

नक्की वाचा: आसाम सरकारचा मोठा निर्णय; नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद

महेश जिवडे हे केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत अंतर्गत प्रशासकीय सेवेतील २००७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. २००७ ते २०२३ त्यांनी आयकर विभागात विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांची जानेवारी २०२४ मध्ये भारत सरकारतर्फे नॅशनल डिफेन्स कॉलेज ६४ व्या कोर्ससाठी निवड झाली. NDC कोर्स साठीची निवड होणे हे अत्यंत खडतर मानले जात असून संपूर्ण जगभरातील पात्र अधिकाऱ्यांमधून अत्यंत मोजक्याच ३ ते ५ जागा भारतातील नागरी सेवांच्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असतात. हा एक अत्यंत प्रतिष्ठित अभ्यासक्रम आहे. ज्यात फक्त वन-स्टार दर्जाचे काही निवडक संरक्षण अधिकारी आणि भारत सरकारचे संयुक्त सचिव दर्जाचे नागरी कर्मचारी उपस्थित असतात.

अवश्य वाचा: पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह गजाआड

परदेशातील निवडक अधिकारी कोर्समध्ये सहभाग (Mahesh Jiwade)

दरवर्षी यूएस, यूके, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, यूएई आणि इतर यांसारख्या मैत्रीपूर्ण परदेशामधील निवडक २५ अधिकारी कोर्समध्ये सहभागी होतात. केवळ लष्कर, नौदल, हवाई दल आणि मैत्रीपूर्ण परदेशी देशांमधील सेवा देणारे ब्रिगेडियर समतुल्य अधिकारी आणि भारतीय नागरी सेवांमधील सहसचिव संचालक समकक्ष अधिकारी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात.

परदेशात जाण्याची संधी (Mahesh Jiwade)

जानेवारी २०२४ पासून सुरू झालेल्या ४८ आठवड्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांना दुसऱ्या देशातील संरक्षण सेवा आणि नागरी सेवांच्या अधिकाऱ्यांसाठीचे धोरणे आणि कार्यपध्दती समजून घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया तसेच दक्षिण आफ्रिका येथे पाठविण्यात आले होते. एनडीसी ही आशियातील प्रशिक्षित व कुशल अधिकारी घडविणारी अग्रणी संस्था आहे. २७ एप्रिल १९६० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नॅशनल डिफेन्स कॉलेज (NDC) चे उद्घाटन झाल्यापासून महाविद्यालयाची भूमिका मोठ्या प्रमाणात निर्णयक्षम प्रशिक्षित तज्ज्ञ अधिकारी निर्माण करण्याची राहिली आहे.

आयकर विभागात कौतुकास्पद कामगिरी (Mahesh Jiwade)

आयकर विभागातील महेश जिवडे यांची कामगिरीही अत्यंत कौतुकास्पद राहिली. २००७ ते २०१२ या कालवधीत सहाय्यक आयुक्त तसेच २०१२ ते २०१६ या कालावधीत उपायुक्त पदावर पुणे येथे काम करतांना त्यांना आयकर विभागातर्फे सलग चार वर्ष सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याने पुरस्कार प्राप्त झाले आहे. नोटबंदीच्या काळात त्यांची बदली गुजरातमध्ये अहमदाबादला सहआयुक्त पदावर झाली. तिथेही त्यांनी अत्यंत कुशलतेने परिस्थिती हाताळून प्रभावी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे २०२० मध्ये सरकारने त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी बढती केली. २०२१ पासून ते मुंबई येथे कार्यरत होते.

त्यांच्या यशाचे श्रेय ते आई- वडिलांच्या संस्काराला व समाजसेवेसाठीच्या कर्तव्य भावनेला देतात. शिघ्र कवियत्री कुसुम जिवडे यांचे ते पुत्र असून आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषणतज्ज्ञ नंदकुमार जिवडे व उद्योजक चंद्रकांत जिवडे यांचे बंधू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here