Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई;मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक

डोंबिवलीतील रिअॅक्टर स्फोटात मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे.डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

0
Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast

नगर : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात (Dombivli MIDC Explosion) अनेक जणांचा होरपळून मृत्य झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की, आसपासच्या परिसराला देखील याचा हादर बसला. आता या प्रकरणात पहिली अटक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता (Malti Mehta) यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिकमधील मेहर धाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

नक्की वाचा : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला, शासकीय वाहनही फोडले

बॉयलर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक मालती मेहता गुन्हा दाखल (Dombivli MIDC Blast)

बॉयलर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील रिअॅक्टर स्फोटात मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे.डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (ता.२३) रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक  आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

नाशिकमधून घेतलं ताब्यात  (Dombivli MIDC Blast)

डोंबिवलीत अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर येथे रहिवाशांनी केमिकल कंपनी हटावची भूमिका घेतली आहे. या कंपन्यांमुळे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमच्याच जमिनी घेऊन त्यावर कंपन्या उभारल्या, मात्र त्याच कंपन्या आमचा गळा घोटत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवाश्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here