Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक

0
Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक
Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक

नगर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog Village) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येला २५ दिवस होऊनही त्यांच्या मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती. यानंतर आज सकाळी मुख्य आरोपी (Main Accued) सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

नक्की वाचा : आरटीजीएस आणि एनईएफटीचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयचा मोठा निर्णय

सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक (Santosh Deshmukh Murder)

सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर आज दोघांना अटक झाली आहे. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभासेंनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. डॉ.वायभासे यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती,अशी माहिती समोर येत आहे.

अवश्य वाचा : ‘स्थळ’ चित्रपटाद्वारे सचिन पिळगांवकर यांचे चित्रपट प्रस्तुतीत पदार्पण; पोस्टर प्रदर्शित

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी (Santosh Deshmukh Murder)

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी आहेत. विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या चार आरोपींना याआधीच अटक करण्यात आली होती. यानंतर आज सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here