Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा ४.० अभियानात नगर महानगरपालिकेला सलग दुसऱ्या वर्षी सहा कोटींचा द्वितीय पुरस्कार

Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा ४.० अभियानात नगर महानगरपालिकेला सलग दुसऱ्या वर्षी सहा कोटींचा द्वितीय पुरस्कार

0
Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा ४.० अभियानात नगर महानगरपालिकेला सलग दुसऱ्या वर्षी सहा कोटींचा द्वितीय पुरस्कार

महाराष्ट्रातील ‘ड वर्ग’ असणाऱ्या १९ महानगरपालिकेतील अहमदनगर महानगरपालिका सलग बक्षीस पटकविनारी महापालिका ठरली

शहरासाठी केलेल्या उपाययोजनांचे चीज झाले : आयुक्त यशवंत डांगे

Majhi Vasundhara Abhiyan : नगर : राज्य शासनाच्या (State Govt) माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत (Majhi Vasundhara Abhiyan) घेतलेल्या अभियानात नगर महानगरपालिकेला (AMC) या वर्षीही राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात पनवेल महानगरपालिकेला प्रथम व नगरला ६ कोटी रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा ४.० अभियानात नगर महानगरपालिकेला सलग दुसऱ्या वर्षी सहा कोटींचा द्वितीय पुरस्कार

कचरा मुक्त शहराला थ्री स्टार मानांकन (Majhi Vasundhara Abhiyan)

नक्की वाचा: भाऊबीजेच्या ओवाळणीपासून एकही बहीण वंचित राहणार नाही; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

यशवंत डांगे यांनी मनपा मध्ये उपायुक्त पदी असताना वसुंधरा अभियानात विशेष मेहनत घेऊन उपाययोजना केल्या त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहराला थ्री स्टार मानांकन व हागणदारी मुक्त शहर odf++ चे प्रमाणपत्र सातत्य ठेवून प्राप्त केले आजवर मनपाला माझी वसुंधरा अभियान २.० प्रथम क्रमांकाची उंच उडी मध्ये १.५० कोटी माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये ड वर्ग महापालिकेत द्वितीय ६ कोटी आणि यंदाच्या वर्षी माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये ड वर्ग महापालिकेत द्वितीय ६ कोटी चे या व्यतिरिक्त शहर सौंदर्यकरणांमध्ये ५ कोटींचे असे एकूण १८.५ कोटींचे बक्षीस मिळवून दिले. केलेल्या कामाचे चीज ते आयुक्त पदावर कार्यरत असताना झाले. नागरिकांच्या व महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे महानगरपालिका ही कामगिरी करू शकली, अशी भावना आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केली.

अवश्य वाचा: नगर शहरासाठी लवकरच ४० इलेक्ट्रिक बसेस – नीलेश लंके

सफाई कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ही कामगिरी (Majhi Vasundhara Abhiyan)

माझी वसुंधरा अभियानात मागील वर्षीही महानगरपालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करत आपले स्थान कायम राखले आहे. भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या. शहरात या विषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभाग व सफाई कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे महानगरपालिका ही कामगिरी करू शकली.

भूमी :- या घटका अंतर्गत मनपाने वर्षभरात देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली. मागील चार वर्षापासून लावलेल्या झाडाचे संगोपन करून त्यांना जगवले. शहरात मनपाने रोपवाटिका तयार केल्या. नगर शहर हरित व सुंदर दिसण्यासाठी हरित अच्छादने तयार केली. कचऱ्याचे घरोघरी संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती. शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा कायम ठेवला.

वायू :- या घटकात मनपाने अभियान कालावधीत हवेची गुणवत्ता तपासून त्यावर उपाययोजना केल्या. सण उत्सवात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यावर बंदी घालून वायु प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्यात आली. शहरातील नागरिकांनी सायकलचा वापर करण्यासाठी शहरात सायकल ट्रॅक तयार केला. शहरातील तयार होणारा बांधकाम, पाडकामाचा राडारोडा, कचरा उचलून विल्हेवाट लावण्यात आली. वायू प्रदूषण कमी होण्यासाठी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यासाठी प्रोत्साहित करून जन जागृती करण्यात आली. चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले.

जल :- या घटकात मनपाने शहरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी उपाय योजना केल्या. शहरातील पाणीसाठ्यांची साफसफाई केली. शहरातील सीना नदी पात्रात स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक इमारतीचे वाटर ऑडिट करण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. गणपती विसर्जन दरम्यान जल प्रदूषण टाळण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम कुंड तयार केले. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना त्याचे फायदे तोटे समजावून सांगून इको फ्रेंडली मूर्तींच्या विक्रीसाठी व नागरिकांनी खरेदी करावी यासाठी प्रयत्न केले.

अग्नी :- या घटकात मनपाने शहरात एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे काम केले. शहरात विविध ठिकाणी सोलार प्लांट लावले. खाजगी तत्त्वावर घरांवर सोलर बसवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच शहरातील सार्वजनिक इमारतीचे एनर्जी ऑडिट करून त्यावर उपाययोजना केल्या. शहरात ग्रीन बिल्डिंग तयार करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

आकाश :- या घटकात मनपाने नागरीकांमध्ये अभिमानाची माहिती पोहोचण्यासाठी स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली. शहर हरित करण्यासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना हरित शपथ दिली. शहरातील पर्यावरण प्रेमी व्यक्तींची पर्यावरण दूत म्हणून निवड करून विविध कार्यक्रमाद्वारे व त्यांच्या सहभागाने शहरात जनजागृती करत अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण केले. तसेच अभियानाची जनजागृती होण्यासाठी मनपाने शहरातील अनेक ठिकाणी अभियानाची पंचतत्वे दर्शवणाऱ्या वास्तू उभारणी, चौक सुशोभीकरण करण्यात आले. या सर्व उपाययोजांमुळे महानगरपालिकेला याही वर्षी दुसरा क्रमांक मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here