Malegaon Rape Case : नगर : मालेगाव तालुक्यातील घरासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (Malegaon Rape Case) करून तिची दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नराधम आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे लहान मुलीच्या हाताने दहन करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, सामाजिक कार्यकर्ते संदीप यादव, माजी नगरसेवक नितीन शेलार, धनंजय जाधव, अंजली आव्हाड, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, विनय वाखुरे, मनेष साठे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक
आमदार जगताप म्हणाले,
समाजामध्ये महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर असून महिलांच्या सुरक्षेतेसाठी सरकारने कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. मालेगाव येथील चिमुकलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ‘त्या’ नराधमाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आहे. अशा नराधमाला एक महिन्याच्या आत शिक्षा होऊन फाशी देण्यात आली पाहिजे. यासाठी शासनाने फास्ट कोर्ट न्यायालयात चालवणे गरजेचे असून त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणारा असल्याचे त्यांनी म्हटले. पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत फरार संशयित आरोपी विजय खैरनार यास अटक केली आहे. या प्रकरणी संशयिताला भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.
नक्की वाचा : संगमनेर नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ विरुद्ध डॉ. मैथिली तांबे ‘दुरंगी’ लढत रंगणार
संदीप यादव म्हणाले, (Malegaon Rape Case)
मालेगाव येथील बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आला आहे. त्या नरधामाला तातडीने शिक्षा होणे गरजेचे आहे. यासाठी कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.



