Maliwada Bus Stand : माळीवाडा बसस्थानकाची होणार पुनर्बांधणी; तारकपूर आगारातून साेडल्या जाणार बस

Maliwada Bus Stand : माळीवाडा बसस्थानकाची होणार पुनर्बांधणी; तारकपूर आगारातून साेडल्या जाणार बस

0
Maliwada Bus Stand

Maliwada Bus Stand : नगर : राज्य परिवहन विभागाच्या (State Transport Department) माळीवाडा बसस्थानकाचे (Maliwada Bus Stand) पुनर्बांधणीचे काम बुधवार (ता. ४) पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, धुळे, नाशिक, कल्याण, श्रीरामपूर, संगमनेर व नेवासे मार्गावरील सर्व बसेस तारकपूर बसस्थानक (Tarakpur Bus Stand) येथून सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी दिली.

नक्की वाचा: आसाम सरकारचा मोठा निर्णय; नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद

बस स्थानकाला ऐतिहासिक पार्श्वभूमी

राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस नगरहून पुण्याला धावली होती. पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे हे होते. त्यानंतर सरोज टाकी भागातून बस सोडल्या जात होत्या. राज्य परिवहन महामंडळाने माळीवाडा बसस्थानकातून सर्व बस सोडण्यास सुरूवात केली. महामंडळाचा जिल्ह्याचा कारभार या स्थानकातून पहिला जात होता. विभागीय नियंत्रक कार्यालय ही याच इमारतीमध्ये होते.

अवश्य वाचा: पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह गजाआड

राज्यातील प्रमुख बसस्थानकांमध्ये माळीवाडा स्थानकाचा समावेश (Maliwada Bus Stand)

माळीवाडा बसस्थानक येथून फक्त तारकपूर, पारनेर, श्रीगोंदे, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या आगारांच्या ग्रामीण फेऱ्या मार्गस्थ होतील. विद्यार्थ्यांसाठी पास वितरण व्यवस्था व प्रवाशांसाठी संगणकीय आरक्षण प्रणाली ही स्वास्तिक बसस्थानक येथून कार्यान्वित राहणार आहे. तरी प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाला सहकार्य करावे, असे एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.