Maliwada Ves : नगर : ऐतिहासिक माळीवाडा वेश (Historic Maliwada Ves) पाडण्याचा निर्णय अहिल्यानगर महापालिकेने (Ahilyanagar Municipal Corporation) घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या माळीवाडा वेशला (Maliwada Ves) हात लावू नये, अशी ठाम भूमिका घेत नागरिक एकवटले असून या निर्णयाविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. माळीवाडा वेश पाडण्याच्या निर्णयाला आक्षेप घेण्यासाठी माळीवाडा परिसरात नागरिकांच्या वतीने अर्ज भरण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने नागरिक सहभाग नोंदवत आहेत.
नक्की वाचा : जगातील पहिली सापाचं विष शोधणारी किट विकसित; डॉ. शाम भट यांच्या प्रयत्नांना यश
निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी
माळीवाडा वेश हे केवळ एक वास्तू नसून शहराच्या इतिहासाचे, परंपरेचे व ओळखीचे प्रतीक आहे. विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक वारसा नष्ट करणे योग्य नसल्याचे मत नागरिक व्यक्त केले आहे. महापालिकेने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा व माळीवाडा वेशचे संवर्धन व जतन करावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
अवश्य वाचा : मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार
माळीवाडा भागातील असंख्य नागरिक उपस्थित (Maliwada Ves)
या अर्ज मोहिमेत नितीन भुतारे, संभाजी कदम, परेश लोखंडे, बाळासाहेब बोराटे, दत्त कावरे, कमलेश जंजाळे, ओंकार घोलप, बाळासाहेब पुंड, धनंजय पालवे, बाबू कावरे यांसह माळीवाडा भागातील असंख्य नागरिक उपस्थित होते.



