Malshej Ghat Accident: माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या धुवांधार पावसामध्ये माळशेज घाटात (Malshej Ghat) रिक्षावर दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत काका आणि पुतण्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. हे दोघेही संगमनेर तालुक्यातील चंदनापूर (Chandanapur) येथील मूळ रहिवासी आहेत.

0
Malshej Ghat Accident: माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू
Malshej Ghat Accident: माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

नगर : महाराष्ट्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या धुवांधार पावसामध्ये माळशेज घाटात (Malshej Ghat) रिक्षावर दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत काका आणि पुतण्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. हे दोघेही संगमनेर तालुक्यातील चंदनापूर (Chandanapur) येथील मूळ रहिवासी आहेत. मुंबईवरून अहमदनगरला आपल्या गावी जात असताना त्यांचा हा अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

नक्की वाचा :  प्रतीक्षा संपली!’मिर्झापूर सीझन ३’ची रिलीज डेट जाहीर

माळशेज घाटामध्ये दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू (Malshej Ghat Accident)

कल्याण वरून अहमदनगरला जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर माळशेज घाटामध्ये दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटे ४. ३० च्या सुमारास घडली आहे. मुलुंड वरून भालेराव कुटुंबीय नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चंदनापूर या आपल्या मूळ गावी जात होते. या अपघातात दैव बलवत्तर म्हणून आई-वडील आणि थोरला मुलगा बचावला आहे. मंगळवारी (ता. ११) रात्रीच्या सुमारास माळशेज घाटातील गणेश मंदिराजवळ घडली आहे.

अवश्य वाचा : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार

चुलता व पुतण्याच्या अंगावर मोठा दगड कोसळला (Malshej Ghat Accident)

राहुल भालेराव (वय ३७) आणि स्वयंम भालेराव (वय ६) या काका-पुतण्याचा जागेवरच मृत्यू झाला असून आई-वडील आणि थोरला भाऊ यातून बचावले आहेत. माळशेज घाटातून प्रवास करत असताना रिक्षामध्ये बसलेल्या चुलता पुतण्याच्या अंगावर अचानक भला मोठा दगड कोसळला आणि मोठा अनर्थ झाला. यात स्वयंम भालेराव, राहुल भालेराव या दोघांचा जागीचा मृत्यू झाला. तर त्यांच्या बाजूलाच बसलेली आई विमल भालेराव (५८),वडील बबन भालेराव वय (६२) व भाऊ सचिन भालेराव (४०) थोडक्यात बचावलेत.

मुरबाड नंतर टोकावडे पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घाट रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या रिक्षावर दरड कोसळली आणि त्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला. रिक्षामध्ये तिघांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवला. दरम्यान ही दरड कोसळल्याची घटना समजताच स्थानिक पोलिस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here