Man-eating Leopard : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई

Man-eating Leopard : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई

0
Man-eating Leopard : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
Man-eating Leopard : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई

Man-eating Leopard Captured : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील खारे कर्जुने येथील नरभक्षक बिबट्या (Man-eating Leopard) वन विभागाच्या (Forest Department) रेस्क्यू टीमने ताब्यात घेतला आहे. या बिबट्याने (Leopard) खारे कर्जुने येथील पाच वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिचा जीव घेतला होता. तसेच इसळक परिसरात एका मुलाला जखमी केले होत. आज सकाळी (ता. १७) रोजी वनविभागाच्या पथकाने नरभक्षक बिबट्या जेरबंद केला आहे.

नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात

ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील खारे कर्जुने येथे ५ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला यात निष्पाप मुलीने जीव गमावला. ही घटना ताजी असतानाच (ता. १४) सायंकाळी इसळक गावात पुन्हा बिबट्याने ८ वर्षांच्या मुलावर हल्ला केला होता. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अवश्य वाचा : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सलग दाेन घटनांमळे नागरीक हाेते संतप्त (Man-eating Leopard)

राजवीर रामकिसन कोतकर (वय ८) असे या बालकाचे नाव असून, इसळक शिवारातील मंदिर वैष्णोदेवी परिसरात असलेल्या कोतवर वस्तीवर ही घटना घडली होती. त्यानंतर वन विभाग व रेस्क्यू टीमने या परिसरात बिबट्या ताब्यात घेण्यासाठी पिंजरे बसविण्यात आले होते. त्यानुसार आज (ता. १७) रोजी एका बिबट्या या पिंजऱ्यात अडकला आहे. ही कारवाई वन परिषेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, त्यांचे पथक प्रमुख मनेश जाधव, विठ्ठल गोल्हार, चेमटे, गाडेकर, सुनील धोत्रे, अर्जुन खेडकर, शैलेश बडदे यांच्या पथकाने केली.