Man-Eating Leopard : नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त; वनविभागाची कारवाई

Man-Eating Leopard : नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त; वनविभागाची कारवाई

0
Man-Eating Leopard : नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त; वनविभागाची कारवाई
Man-Eating Leopard : नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त; वनविभागाची कारवाई

Man-Eating Leopard : नगर : कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वन विभागाने (Forest Department) शोधमोहीम राबवून नरभक्षक बिबट्याचा (Man-Eating Leopard) मागोवा घेतला. टाकळी आश्रम शाळे मागील परिसरात उपस्थिती आढळताच कोपरगाव वनपरिक्षेत्राच्या (Forest area) पथकाने शार्पशूटर टीमने कारवाई करून रात्री बिबट्याचा बंदोबस्त केला. अंदाजे पाच ते सहा वर्षांचा नर बिबट मृत अवस्थेत आढळून आला. त्याला शवविच्छेदनासाठी बारागाव नांदूर रोपवाटिकेत हलविण्यात आले असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई

वन विभागाच्या पथकाची शार्पशूटर टीमसह कारवाई

कोपरगाव तालुक्यातील येसगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला होता. दोन सलग घटनांनंतर नागरिकांनी अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्या आदेशानुसार वन विभागाच्या पथकाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बिबट्याची शोधमोहीम राबवून मागोवा घेतला. टाकळी आश्रम शाळे मागील परिसरात वन परिक्षेत्राच्या पथकाने शार्पशूटर टीमसह तत्काळ कारवाई करून रात्री ९.४५ वाजता बिबट्याचा बंदोबस्त केला.

नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई

यांच्या पथकाने केली कारवाई (Man-Eating Leopard)

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक नाशिक (प्रा) मल्लिकार्जुन आणि उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे, सुनील साळुंके, सागर केदार, सुभाष सांगळे, वाघूलकर, शार्पशूटर राजीव शिंदे व टीम, तसेच रेस्क्यू अँड एनिमल सपोर्ट टीम नाशिक–पुणे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here