Manvat Murders:’मानवत मर्डर्स’चा टीझर आऊट,महाराष्ट्र हादरवणाऱ्या हत्याकांडावर आधारित वेब सीरीज

0
Manvat Murders:'मानवत मर्डर्स'चा टीझर आऊट,महाराष्ट्र हादरवणाऱ्या हत्याकांडावर आधारित वेब सीरीज
Manvat Murders:'मानवत मर्डर्स'चा टीझर आऊट,महाराष्ट्र हादरवणाऱ्या हत्याकांडावर आधारित वेब सीरीज

Manvat Murders : महाराष्ट्र हादरवणाऱ्या घटनेवर आधारित ‘मानवत मर्डर्स’ (Manvat Murders) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मानवत मर्डर्स’ या क्राइम थ्रिलर वेब सीरीजचा दमदार टीझर (Teaser Out) सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. सोनी लिव्‍ह (Sony live)ओटीटी प्लँटफॉर्म ही क्राइम थ्रिलर सीरीज ‘मानवत मर्डर्स’ घेऊन येत आहे.

नक्की वाचा : ‘एक डाव भुताचा’ चित्रपटातील ‘वाजणार गं गाजणार गं’ गाणं प्रदर्शित

आशिष बेंडे यांनी केले ‘मानवत मर्डर्स’चे दिग्दर्शन (Manvat Murders)

मानवत मर्डर्स वेब सीरिज ७० च्या दशकातील भयानक हत्याकांडावर आधारित आहे. महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या स्‍टोरीटेलर्स नूक प्रोडक्शन हाऊस आणि गिरीश जोशी यांची निर्मिती असलेल्या सीरीजचे दिग्‍दर्शक आशिष बेंडे आहेत. भारताचे सीआयडीमधील प्रतिष्ठित डिटेक्टिव्‍ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची आत्‍मचरित्रात्‍मक कलाकृती ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम’वर आधारित ‘मानवत मर्डर्स’  ही सिरीज आहे.

या सीरीजमध्‍ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्‍हणकर असे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या वेब सीरिजमध्ये ‘मानवत मर्डर्स’ म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात भयानक ऐतिहासिक घटनेचा उलगडा होणार आहे.

अवश्य वाचा : मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास,४०वर्षांनंतर भारताला मिळवून दिले पदक

टीझरमध्ये नेमके काय ? (Manvat Murders)


‘मानवत मर्डर्स’ आगामी सीरीजमध्‍ये रमाकांत एस. कुलकर्णी यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत तपास पथक या खटल्‍याची तपासणी करताना पाहायला मिळणार आहे. आशुतोष गोवारिकर रमाकांत कुलकर्णी यांच्या भूमिकेत या गुंतागूंतीच्‍या केसचा उलगडा करताना दिसतील. १९७० च्‍या दशकातील ग्रामीण महाराष्‍ट्रातील गूढ हत्‍यांची मालिका सोडवण्‍याचे आव्‍हान त्यांच्या पुढे असणार आहे. यादरम्‍यान रमाकांत कुलकर्णी ही गुंतागुंतीची केस सोडवू शकतील का आणि वेळ निघून जाण्यापूर्वी पीडितांना न्‍याय मिळवून देतील का? याचे उत्तर आपल्याला ४ ऑक्टोबरला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here