
Mangal Prabhat Lodha : नगर : भाजप पक्ष (BJP) आज खंबीरपणे उभा आहे तो सर्व कार्यकर्त्यांमुळेच. कार्यकर्ता आहे तर पक्ष आहे व सरकार आहे. म्हणून पक्षात सर्व कार्यकर्त्यांना खूप महत्व आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिलेले काम व जबाबदारी मनापासून करून कर्त्यव्य निभावावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकटे काहीही करू शकत नाही. भारतास व महाराष्ट्रास पुढे नेण्यासाठी ज्या सरकारी योजना आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे. पक्षाची खरी ताकद बूथ रचना आहे. शहरातील व जिल्ह्यातील पक्षाची बूथ रचना मजबूत करा, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी केले.
नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू; कोलकाता येथे होणार अंत्यसंस्कार
यावेळी मंत्री लोढा म्हणाले,
राज्यासह अहिल्यानगर मधील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये लवकरच अत्याधुनिक मशिनरी युक्त नवीन कोर्सेस सुरू होणार आहेत. तसेच छोट्या कार्यकाळाचे नव्या तंत्रज्ञान युक्त कोर्सेसही सुरू होणार आहेत. अहिल्यानगरमध्ये ऑगस्ट महिन्यात महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणार आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, (Mangal Prabhat Lodha)
मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेली आहे. कार्यकर्त्यांना बळ देत ते सामाजिक जाणीवेतून काम करत आहेत. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मंत्रालयाच्या योजना राबवण्यासाठी मंत्री लोढा यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अहिल्यानगरमध्ये गुरवारी (ता.२४) भाजप पक्षाच्या जिल्हा व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत बूथ रचनेचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे, सरचिटणीस महेश नामदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, अशोकराव गायकवाड धनंजय जाधव, विनायक देशमुख, बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.