Manikrao Kokate : अहिल्यानगर : नाशिक येथे अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषी मंत्र्यांनी (Agriculture Minister) केलेले वक्तव्य वादात सापडले आहे. कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी साखरपुडा व लग्न करतात आशयाचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होताना दिसत आहे. यावरुनच किसान सभा देखील आक्रमक झाली आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम म्हणून शेतकरी (Farmers) किती अडचणीत आहेत याची काडीची जाणीव नसल्यानेच कृषीमंत्री मामिकराव कोकाटे यांनी असे विधान केले असल्याची टीका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) यांनी केली आहे.
नक्की वाचा : लोकसभेत मंजूर झालेल्या ‘वक्फ बोर्ड’ विधेयकाला विरोध का ?
अजित नवले म्हणाले की,
माणिकराव कोकाटे सारखी माणसेअशी विधाने करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली होती. अशा उथळ व सहिष्णुता नसलेल्या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांना कार्यमुक्त केले पाहिजे अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
अवश्य वाचा : रस्त्याच्या वादातून लोखंडी पाईपने मारहाण; गुन्हा दाखल
एकनाथ खडसे म्हणाले की, (Manikrao Kokate)
अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे उभी पिके या अवकाळी मुळे उध्वस्त झाले आहेत. मात्र कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं वक्तव्य निर्लज्जपणाचा कळस आहे. राज्याचा कृषीमंत्री अशा स्वरुपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे, याबाबत चिंता करण्याची गरज मंत्र्यांना भासत नाही हे दुर्दैव आहे. असं एकनाथ खडसे म्हणाले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.