
Manikrao Kokate : नगर : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया (Collector Office) समोर निदर्शने करुन ठिय्या देण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जुगारी (Gambling) कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा दिल्या.
नक्की वाचा : पुण्यातील धनकवडीत २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; २० ते २५ वाहनांची तोडफोड
राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, अशोक बाबर, प्रकाश पोटे, अथर खान, गौरव नरवडे, फरीन शेख, रुकैय्या शेख, अल्तमश जरीवाला, समीर पठाण, सरपंच शरद पवार, फय्याज तांबोली, अनिस शेख, आरिफ पटेल, जावेद शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : सुवर्णपदक विजेता देवदत्तने साधला I❤️नगरशी खास संवाद…
जनतेच्या भावना दुखावल्याचे आंदोलकांचे म्हणने (Manikrao Kokate)
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्च भाषेत उद्गार काढून त्यांचा अपमान केला आहे. पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी, कर्जमाफी वरील वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. एका कृषिमंत्रीने शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. कृषिमंत्री कोकाटे विधान परिषदेत अधिवेशन सुरू असताना चक्क मोबाईलवर रम्मीचा जुगार खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे भावना दुखावल्या गेल्या असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहार. शेतकरी वर्गाला कोणत्याही प्रकारचे न्याय व आधार मिळू शकणार नसून, पुरोगामी महाराष्ट्रात अशा व्यक्तीच्या ताब्यात कृषिमंत्री पदाची जबाबदारी ठेवणे म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करुन कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना देण्यात आले.