Manikrao Kokate : कर्डिले कुटुंबीयांची क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून सांत्वन

Manikrao Kokate : कर्डिले कुटुंबीयांची क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून सांत्वन

0

Manikrao Kokate : नगर : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी बुर्‍हाणनगर (Burhannagar) येथे आमदार स्व. शिवाजी कर्डीले (Shivajirao Kardile) यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

अवश्य वाचा : हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?

प्रतिमेस पुष्प अर्पण करून वाहिली श्रद्धांजली

कोकाटे यांनी स्व. कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले, आमदार संग्राम जगताप व कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

नक्की वाचा : हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी : आयुक्त डांगे

कर्डिले सामान्य जनतेच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर (Manikrao Kokate)

स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्याशी त्यांची खूप जुनी मैत्री होती. ते मनमिळावू व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर असलेले नेतृत्व होते. त्यांच्या अचानक निधनामुळे कर्डिले कुटुंबीयांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खातून कर्डिले कुटुंबीयांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, अशा शब्दांत मंत्री कोकाटे यांनी भावना व्यक्त केल्या.