Manikrao Kokate : विधिमंडळाच्या २०२३ साली पार पडलेल्या अधिवेशनात कृषी विभागाकडून (Department of Agriculture) देण्यात आलेल्या आश्वासनाची अजून पूर्तताच झालेली नाही. कृषी विभागाला निधी मिळाला नसल्यामुळे कामे करण्यास अडचणी येत असल्याची कबुली (Confession) राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी विधान परिषदेत (Vidhan Parishad) दिली आहे.
नक्की वाचा : बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी राज्यात ‘शोध मोहीम’राबविली जाणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
कृषी विभागाचे वार्षिक १२०० कोटी रुपयांचे बजेट आहे. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये निधीची कोणतीच तरतूद नाही. बजेट नसल्यामुळे नवीन कोणत्याही कामाला परवानगी देऊन सरकारला अडचणीत आणणार नाही. २०२३ साली आश्वासन दिलेली कामे सध्या अर्धवट असल्याने आधी ती पूर्ण करण्यावर भर देणार असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात दिली आहे.
अवश्य वाचा : ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’;’या’ दिवशी होणार प्रदर्शित
माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले ? (Manikrao Kokate)
विधान परिषदेत माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संशोधन केंद्र स्थापनेबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र, संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला नियोजन व वित्त विभागाने अनुकूलता दर्शविली नाही. सद्यस्थितीत राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत नवीन महाविद्यालयाची तसेच संशोधन केंद्राचे शासनावर लक्षणीय प्रमाणात दायित्व असल्याने हे दायित्व कमी होईपर्यंत नवीन महाविद्यालय आणि संशोधन केंद्र स्थापन न करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे,असे देखील कोकाटेंनी सांगितले.
“संशोधन केंद्रावर अधिक भर द्यायला हवा” (Manikrao Kokate)
माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, सद्यस्थितीत राज्यात ७६ संशोधन केंद्र आणि १०९ अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प आहेत. वसंतराव नाईक मराठा वाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत एकूण १८ संशोधन केंद्र कार्यरत आहेत. तसेच २२अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प आहेत. मी सुद्धा या बाबतीत खूप सकारात्मक आहे. माझी देखील इच्छा आहे की, महाविद्यालय आणि इतर सगळ्या गोष्टीत पैसे खर्च करण्यापेक्षा आपण संशोधन केंद्रावर अधिक भर दिला तर शेतकऱ्यांना त्यातून जास्त संशोधन आणि फायदा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.