Manikrao Kokate:माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवणार,कृषी खातं काढून घेतलं जाणार 

0
Manikrao Kokate:माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवणार,कृषी खातं काढून घेतलं जाणार 
Manikrao Kokate:माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवणार,कृषी खातं काढून घेतलं जाणार 

नगर : मागील अनेक दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चांगलेच चर्चेत आहेत. पावसाळी अधिवेशन चालू असताना ते सभागृहात ऑनलाईन रमी गेम (Online Rummy Game) खेळताना आढळले होते. त्यांचा हा व्हिडीओ देखील सगळीकडे व्हायरल झाला आहे. कोकाटेंच्या या कृतीमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी (Demand for Resignation) केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेतलं जाणार आहे.

नक्की वाचा : एका हत्तीणीसाठी अख्खं ‘कोल्हापूर’ रडलं, ती ‘महादेवी’ नेमकी कोण ?

माणिकराव कोकाटेंबाबत काय निर्णय घेतला जाणार ? (Manikrao Kokate)

गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा,अशी मागणी केली जात होती. त्यासाठी राज्यभर आंदोलनेही झाली. विरोधकांचा आणि जनतेचा आक्रोश लक्षात घेता आता मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखाते काढून घेतले जाणार आहे. त्यांच्या खात्याचा कारभार अन्य नेत्याकडे सोपवला जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

अवश्य वाचा :पालतू फालतू’ मध्ये सुबोध-रिंकूच्या नात्याची मिश्किल झलक;‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित  

कोकाटेंना अन्य खात्याची जबाबदारी? (Manikrao Kokate)

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात नुकतीच बैठक झाली आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे  सांगितले जात आहे. कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्यावर अन्य खात्याची जबाबदारी सोपवली जाईल, असे सांगितले जात आहे.आज संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्षाचेच दत्ता भरणे आणि मकरंद पाटील या दोन्ही मंत्र्यांकडे असलेली खाती ही माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर कोकाटे यांना दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील या दोन मंत्र्यांच्या खात्यांपैकी एक खाते दिले जाऊ शकते,अशी शक्यता आहे.