Manikrao Kokate : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते ॲड.माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयाने कायम ठेवला होता. या निर्णयाला स्थगिती मिळावी,या मागणीसाठी माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नसली तरी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.
नक्की वाचा: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांग्लादेशात हिंसाचार ;शरीफ उस्मान हादी नक्की कोण?
नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यामुळेच कोकाटे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती कोकाटे यांच्या वतीने वकील अनिकेत निकम यांनी न्यायमूर्ती आर.एन.लढ्ढा यांच्या एकलपीठाकडे केली. तर, न्यायमूर्ती लढ्ढा यांनी निकम यांची विनंती मान्य करून या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवली होती.
नेमकं प्रकरण काय आहे ? (Manikrao Kokate)

कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे सादर करावी लागतात. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या होत्या.
अवश्य वाचा: अहिल्यानगर जिल्ह्याला दुसरे मंत्रिपद मिळणार का? राजकीय चर्चांना उधाण
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती नाहीच (Manikrao Kokate)
या प्रकरणात माणिकराब कोकाटेंना हाय कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हाय कोर्टानं कोकाटे यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता तुर्तास तरी कोकाटे यांची अटक टळली आहे. मात्र कोर्टाकडून माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही.



