नगर : मला आणि सर्व राष्ट्रवादी पक्षाला विश्वास आहे की,अजित पवार (Ajit Pawar) हे कधीच चुकीचं काम करणार नाहीत,जर आरोप सिद्ध झाले तर अजित पवार राजीनामा देतील असं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप (Parth Pawar Accused Of Land Scam) झाला आहे, त्यामुळे पार्थ पवार यांच्यासोबतच अजित पवार यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. यावर बोलताना कोकाटे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
नक्की वाचा: ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे ? (Manikrao Kokate)

माणिकराव कोकाटे म्हणाले की, अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. अजित पवारांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, त्यांचा स्वभाव कसा आहे? ते कधीच काही चुकीचं काम करणार नाहीत.मात्र मीडियानं हे सर्व प्रकरण लावून धरलं आहे. विरोधी पक्षांकडून अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा प्रकारचं कुठलंही काम दादा करू शकत नाहीत. हा माझा आत्मविश्वास आहे. माझाच नाही तर सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील आत्मविश्वास आहे.
अवश्य वाचा: कोकणातील राजकारणात आता बच्चू कडूंची एन्ट्री!
‘दोषी आढळले तर अजित पवार राजीनामा देतील’ (Manikrao Kokate)
एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, नुसतं आरोप करणं बरोबर नाही, ते आरोप सिद्ध पण झाले पाहिजेत ना, आम्ही जाहीरपणे सांगतो, जी काही चौकशी आहे ती चौकशी करा, आम्ही त्या चौकशीला सामोरं जाऊ, दोषी आढळले तर अजित पवार राजीनामा देतील,असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.



