Manikrao Kokate:कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा ‘रमी’ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल;प्रकरण नेमकं काय ?

0
Manikrao Kokate:कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा 'रमी' खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल;प्रकरण नेमकं काय ?
Manikrao Kokate:कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा 'रमी' खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल;प्रकरण नेमकं काय ?

नगर : सध्या राज्याच्या राजकारणात कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे नाव सातत्याने चर्चिले जात आहे. माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे (Controversial Statement) सतत चर्चेचा विषय बनत आहेत. आता कोकाटे पुन्हा एकदा नव्या वादात सापडलेत. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात कामकाज सुरू असताना कोकाटे यांचा मोबाईलवर रमी हा पत्त्यांचा गेम खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतील हजारो अर्ज बाद;नव्या नोंदी बंद

कृषिमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल  (Manikrao Kokate)

एकीकडे राज्यात शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असतांना कृषिमंत्र्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केला आहे. मात्र,मी रमी गेम खेळत नव्हतो. तर कुणाला तरी दाखवत होतो की, मोबाईलवर कशाप्रकारे रमीची जाहिरात येते,असे स्पष्टीकरण कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या व्हिडिओबाबत दिले आहे.

अवश्य वाचा :  “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात धडधडीत खोटं बोलले”;सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा संताप 

लातूरमध्ये संतापाची लाट (Manikrao Kokate)

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळात मोबाइलवर रमीचा डाव खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनतेतून संतापाची लाट उसळली आहे. याचा परिणाम लातूरमध्ये देखील झाल्याचा  पाहायला मिळाला आहे. लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देत त्यांच्यासमोर पत्ते उधळल्याचा प्रकार घडलाय. तसेच “मंत्री सभागृहात जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी पत्ते खेळत असतील तर त्यांना घरी बसवा आणि घरीच पत्ते खेळायला सांगा, त्यासाठी हे पत्ते त्यांना द्या”, असं म्हणत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देखील दिल्या आहेत.

मात्र निवेदन देऊन बाहेर पडत असलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर यावेळी अचानक हल्ला करण्यात आला. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी ‘छावा’च्या प्रतिनिधींवर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली.लातूरच्या शासकीय विश्रागृहात या सगळ्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे.