Manipur CM Attacked:मोठी बातमी! मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांच्या ताफ्यावर हल्ला

मणिपूरमध्ये (Manipur) आणखी एक मोठी घटना घडली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांच्या सुरक्षा ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला (Terrosit Attack) केल्याची घटना घडली आहे.

0
Manipur CM Attacked:मोठी बातमी! मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांच्या ताफ्यावर हल्ला
Manipur CM Attacked:मोठी बातमी! मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांच्या ताफ्यावर हल्ला

नगर : मणिपूरमध्ये (Manipur) आणखी एक मोठी घटना घडली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांच्या सुरक्षा ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला (Terrosit Attack) केल्याची घटना घडली आहे. कांगपोकपी जिल्ह्यात हा हल्ला झाला असून त्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री मंगळवारच्या दौऱ्यावर निघण्याआधीच त्यांच्या सुरक्षा पथकावर हल्ला करण्यात आला आहे.

नक्की वाचा : पंतप्रधान होताच मोदींचा मोठा निर्णय;पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा सुरक्षा ताफ्यावर हल्ला (Manipur CM Attacked)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा सुरक्षा ताफा मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरिबाम जिल्ह्यात जात होता. मात्र त्यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर अचानक अनेक राऊंड फायर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी तत्काळ प्रत्युत्तराची कारवाई केली. हा गोळीबार बराच उशीर सुरू असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांवरील हा हल्ला म्हणजे मणिपूरच्या लोकांवरील हा थेट हल्ला असल्याचं समजलं जाईल. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल असं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटलं.

अवश्य वाचा : श्रेया बुगडे दिसणार नव्या अंदाजात;झी मराठीवरील ‘या’ कार्यक्रमाचे करणार सूत्रसंचालन 

सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी (Manipur CM Attacked)

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या अॅडवान्स सुरक्षा दलावर झालेल्या हल्ल्यात सीआयडी राज्य पोलीस, सीआईएसएफ जवानासहित २ सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यातील जखमींना इंफाळ येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी जिरीबाममध्ये हिंसा झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या भागात परिस्थिती तणावपूर्ण आहेत. याच परिस्थितीचा आढावा घेण्याची मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना मंगळवारी जिरीबाम येथे जायचं होतं. त्याचवेळी सकाळी १०.३० वाजता कांगपोकपी जिल्ह्यातील कोटलेनजवळ टी लाइजांग गावाजवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यात दोन सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर पोलीस कमांडो आणि आसाम रायफल्सने सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here