Manjarsumba Fort : नगर : नगर शहरापासून उत्तरेला २० किलोमीटर अंतरावर गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये मांजरसुंबा किल्ल्यात (Manjarsumba Fort) काही प्राचीन खेळपट आढळून आले आहेत. या ठिकाणी ‘मंकळा’ या खेळाच्या ५ पटांचे दस्तावेजीकरण व नोंद करण्यात आली आहे. कोणत्याही किल्ल्यातला हा एक अतिशय दुर्मिळ शोध आहे. प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेंतर्गत (महाराष्ट्र राज्य)(State of Maharashtra) प्राचीन पटखेळांचे संशोधन व शोधमोहीम सुरू आहे. नाशिकचे प्राचीन पटखेळ अभ्यासक व पुरातत्त्व शास्त्रज्ञ (Archaeologists) सोज्वळ साळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोधमोहीम सुरू असून शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे, विठ्ठल ढाणे, अभिजित सुर्वे यांना मांजरसुंबा गडाच्या फिरस्ती दरम्यान आज (ता. २५) ‘मंकळा’ या दुर्मिळ खेळपटांचा शोध लागला.
अवश्य वाचा : उज्जैन च्या महाकाल मंदिरात आगीचा भडका;पुजाऱ्यांसह अनेक जण होरपळले
आजवर सर्वाधिक ३८ प्राचीन पटखेळ धर्मवीर गडावर
आपल्याकडे आढळणारे हे प्राचीन पटखेळ पूर्वी राजेशाही आणि उच्चभ्रू लोकांचे मनोरंजनाचे साधन होते. हे खेळ कालांतराने न्यायालयीन संस्कृतीचे सामान्य वैशिष्ट्य बनले. त्यात भेटवस्तू म्हणून देखील पटखेळांची देवाणघेवाण झाली. आपल्याकडील अडी (घाना), अंडोत (सुदान), अजिटो अथवा योवोदजी (बेनिन, निगेरिया), इन डोडोई (केनिया, टांझानिया), लँठो (इथिओपिया), लिब अल-अकील (इजिप्त) या नावांनी त्या-त्या देशांत हे खेळ ओळखले जातात. नगर जिल्ह्यमध्ये आजवर सर्वाधिक ३८ प्राचीन पटखेळ श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडावर शोधले गेले आहेत.
हेही पहा : एसआयटीच्या चौकशीला मी घाबरत नाही : मनोज जरांगे पाटील
महाराष्ट्रात २०हून अधिक प्रकारच्या पट खेळांची नोंद (Manjarsumba Fort)
महाराष्ट्रात आजवर एकूण २०हून अधिक प्रकारच्या पट खेळांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये आजवर एकूण ९०० प्राचीन खेळांची नोंद व दस्तऐवजीकरण पूर्ण झाले आहे. यावरून व्यापारी, प्रवासी, बौद्ध भिक्षुक अथवा मुघल साम्राज्यातील सैनिक या मार्गावरून जात असावेत, असा अंदाज मांडता येऊ शकतो. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.