Manmohan Singh : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

Manmohan Singh : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

0
Manmohan Singh
Manmohan Singh

Manmohan Singh : नगर : 2024 लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) शेवटच्या टप्प्यापूर्वी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये मनमोहन सिंग यांनी गुरुवारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर द्वेषपूर्ण भाषणे देऊन सार्वजनिक प्रतिष्ठा आणि पंतप्रधान कार्यालयाचे गांभीर्य कमी केल्याचा आरोप केला आहे.

हे देखील वाचा: शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हाकलपट्टी करावी; महसूलमंत्र्यांची मागणी

पंजाबच्या मतदारांना केले आवाहन

मनमोहन सिंग यांनी 1 जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यापूर्वी पंजाबच्या मतदारांना केलेल्या आवाहनात अनेक गोष्टींवर खुलेपणाने लिहिले आहे. काँग्रेसची सत्ता आल्यावरच लोकशाही आणि संविधानाचे रक्षण होईल. पुढे मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे की, अमानवीकरणाची ही कहाणी आता शिगेला पोहोचली आहे. आता आपल्या प्रिय देशाला या बेताल शक्तींपासून वाचवणे हे आपले कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले.

Manmohan Singh
Manmohan Singh

नक्की वाचा : मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून

अग्निवीर योजना लादल्याबद्दल सरकारवर हल्लाबोल (Manmohan Singh)

वरिष्ठ काँग्रेस नेते मनमोहन सिंह यांनी सशस्त्र दलांवर ‘चुकीच्या विचारांची’ अग्निवीर योजना लादल्याबद्दल भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदींवर हल्लाबोल करत माजी पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, या लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान मी होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. मोदीजी अत्यंत द्वेषपूर्ण भाषणे करत आहेत, ही भाषणे पूर्णपणे फूट पाडणारी आहेत. मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी केवळ सार्वजनिक प्रतिष्ठाच कमी केली नाही तर पंतप्रधान कार्यालयाचे गांभीर्यही कमी केले आहे. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने असे घृणास्पद, असंसदीय आणि असभ्य शब्द वापरलेले नाहीत.

भाषणांमधून झालेल्या टीकेला दिले उत्तर
“काही खोट्या विधानांसाठी त्यांनी मला जबाबदार धरले आहे. मी माझ्या आयुष्यात असे कधीच बोललो नाही. हा भाजपचा एकमेव कॉपीराइट आहे”. पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला अधिकार दिला आहे. सिंग म्हणाले की, भारतातील जनता हे सर्व पाहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here