Manoj Jarange:मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

मराठा नेते मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जरांगे यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे.

0
Manoj Jarange:मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द
Manoj Jarange:मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

Manoj jarange: मराठा नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना पुणे न्यायालयाने (Pune Court) मोठा दिलासा दिला आहे. जरांगे यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द (Arrest warrant cancelled) करण्यात आलं आहे. आज न्यायालयामध्ये मनोज जरांगे यांच्या वकीलाने गेल्या सुनावणीवेळी उपस्थित नसल्याची कारणे सांगितले आहेत.

गेल्या सुनावणीला आजारी असल्यामुळे मनोज जरांगे उपस्थित राहू शकले नाहीत. ते आजारी असल्याचे त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट आहेत. त्यामुळे त्यांचं वारंट रद्द करावं. आमचा कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांची आज तब्येत ठीक नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णवाहिकेमध्ये जरांगे आले आहेत, अशी माहिती जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे. संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत असून डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड संबंधी आजार असल्याचे सांगितले आहे.

नक्की वाचा : स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक,कसा आहे त्याचा प्रवास?

न्यायालयाने काय सांगितले? (Manoj Jarange)

न्यायालयाचा आदेश असतानाही मनोज जरांगे न्यायालयात उपस्थित न राहिल्याने हा खटला प्रलंबित राहिला. हे प्रकरण १० वर्ष जुने असून अशा जुन्या प्रकरणाचा त्वरित निपटारा होण्यासाठी योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे. जरांगे पाटील यांनी समाज माध्यमांद्वारे कोर्टाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याची बाब समोर आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि न्यायालयाचा अवमान होईल, अशी टिप्पणी करण्यापासून प्रत्येकाने टाळावे. त्यामुळे न्यायालयाच्या अवमान होईल अशा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही, असंही यावेळी न्यायालयाने म्हटलं आहे. सध्या आरोपीने या न्यायालयाबाबत अथवा न्यायालयाच्या पिठासीन अधिकाऱ्यांबाबत वक्तव्य केली असल्याने कारवाई करण्याचा अधिकार या न्यायालयाचा आहे. जरांगे पाटील यांनी यापुढे टिप्पणी करताना दक्षता बाळगावी, अशी सूचना न्यायालयाने दिली आहे.

काय आहे प्रकरण ? (Manoj Jarange)

मनोज जरांगे पाटलांविरोधात पुण्यातील वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. यामध्ये मनोज जरांगे यांच्यासह आणखी दोन जणांची नावे घेण्यात आलेली आहेत. या प्रकरणामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. दोन वेळा हजर राहण्यासाठी समन्स बजावून देखील हजर न झाल्याने कोर्टाने मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोन जणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. दोन ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर पार पडणाऱ्या सुनावणीस मनोज जरांगे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ते आज सुनावणीला हजर राहणार आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here