Manoj Jarange : मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी होणार; नार्वेकरांचे आदेश

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

0
Manoj Jarange
Manoj Jarange

नगर :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज विधानसभेत त्याचे पडसाद उमटले. आमदार आशिष शेलार यांनी जरांगेंचा बोलविता धनी कोण आहे, असे म्हणत एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत केली.

नक्की वाचा : मराठा आंदोलनामुळे संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद  

आमदार आशिष शेलार यांची जरांगेंवर टीका (Manoj Jarange)

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत मनोज जरांगे यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. “मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे? महाराष्ट्राला बेचिराख करण्याची भूमिका घेतली जात असेल तर विरोधी पक्ष आमच्यासोबत असेल. संपवून टाकू, निपटून टाकू, बोलण्याची हिंमत जरांगे मध्ये कशी आली. आधी भुजबळ, मग उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्र्यांना धमकी जरांगे यांच्या मागे कोण आहे ? असे प्रश्न शेलारांनी उपस्थित केले.

शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. “हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला कुठलेही स्थान नाही. ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा संदेश जाणे घातक असेल. त्यामुळे याची सखोल चौकशी शासनाने करावी”, असे नार्वेकर म्हणाले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाची चौकशी केली जाईल,अशी घोषणा केली.

अवश्य वाचा : आशा सेविकांच्या मागण्यांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक  

मराठा समाजा माझ्या पाठीशी उभा राहिला – देवेंद्र फडणवीस (Manoj Jarange)

फडणवीस म्हणाले, “अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन होईल. मला या विषयावर बोलण्याची इच्छा नव्हती. पण, महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला माहितीये की, मी मराठा समाजासाठी काय केलं. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मुख्यमंत्री असेपर्यंत ते सुप्रीम कोर्टातही टिकवलं. मराठा समाजाच्या संदर्भात मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी जे काही केलं ते मराठा समाजाला माहित आहे. मनोज जरांगे माझ्याबद्दल बोलल्यानंतर  मराठा समाजा माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या नाही. सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल”, असे फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here