Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा मुंबईत पुन्हा आंदोलनाचा इशारा

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगेंचं उपोषण सुरु आहे. सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

0
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

नगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी येथे जरांगेंचं उपोषण सुरु आहे. सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत आहे. मात्र बुधवारी (ता.१४) जरांगे यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले होते. मात्र जरांगेंनी सलाईन काढून टाकले आहे.

नक्की वाचा :  सोनिया गांधी राजस्थानमधून लढवणार राज्यसभेची निवडणूक  

मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा जरांगेंचा इशारा (Manoj Jarange Patil)

मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मनोज जरांगे यांची आग्रही मागणी आहे. मागणी पूर्ण झाली नाही, तर मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकार आता त्यांच्या उपोषणात मध्यस्थी करणार की जरांगे पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करणार हे पाहावं लागणार आहे. जरांगे पाटील यांनी  प्रतिक्रिया देताना सांगितलं की, सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी घेणार आणि तसं नाही झालं तर, उपोषण करतच मुंबईत घुसणार,असा इशारा त्यांनी दिला आहे.

२० फेब्रुवारीला एकदिवसीय खास अधिवेशन (Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारीला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी २० फेब्रुवारीला विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता २० फेब्रुवारीला मराठा आरक्षणासंबंधित मागण्यावर चर्चा करण्यासाठी अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात पात्र मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here