नगर : मराठा आरक्षणाचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजताना पाहायला मिळत आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. आता,यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी एसआयटी चौकशीचं स्वागत केलं आहे. पण, ही चौकशी एकतर्फी न करता सर्व नेत्यांची देखील करावी असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
नक्की वाचा : मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी होणार; नार्वेकरांचे आदेश
‘देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकावं लागेलं’- जरांगे (Manoj Jarange)
एसआयटी चौकशीमध्ये जर माझं सगळं खरं निघालं तर एसआयटीला मात्र, देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकावं लागेलं, असंही पुढे जरांगे यांनी म्हटलं आहे. यंत्रणा मात्र, घटनेला आणि कायद्याला धरून वापरा, तुम्ही निष्पक्षपातीपणे लढा. पण, मी खरा असेल तर ज्याने एसआयटी चौकशी लावली त्यांना जेलमध्ये टाकावं लागेल. कारण मला माहिती आहे. मी पळपुटा नाही, एसआयटी चौकशीसमोर मी सगळं सांगतो, असं मनोज जरांगे म्हणालेत.
अवश्य वाचा : ‘द क्रू’ मध्ये करीना, क्रिती व तब्बू झळकणार; पोस्टर रिलीज
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगेंची कडवी टीका (Manoj Jarange)
मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवी टीका केली होती. तसेच महाराष्ट्राला बेचिराख करण्यापासून वाचवलं असे शब्द वापरले होते. यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूचे आमदार आक्रमक झाले. यावेळी जरांगेंच्या विधानांमागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी तर विधानपरिषदेत प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.