Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित; पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवणार

Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित; पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवणार

0
Manoj Jarange

Manoj Jarange : नगर : गेल्या १६ दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु होते. परंतु, अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा तसेच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी तूर्तास दोन पावले मागे घेत आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  आता राज्यभरात फिरुन पुन्हा मराठा आरक्षणाबाबत रान उठवणार आहे.

हे देखील वाचा: मराठा आंदोलनामुळे संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

उपचार घेऊन पुढचा दौरा घोषित करणार

मनोज जरांगे यांनी आज दुपारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. आता मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे, हे ठरवेन. पुढील एक-दोन दिवस मी उपचार घेईन. त्यानंतर लगेच पुढचा दौरा घोषित करेन.

Manoj Jarange

नक्की वाचा: आशा सेविकांच्या मागण्यांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक

शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावे (Manoj Jarange)

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

संचारबंदीमुळे मराठा बांधवांना इकडे येणे शक्य नाही. त्यामुळे लोक सैरभैर झालेत. मी सुखरुप आहे. मला कोणीही कुठेही नेलेले नाही. तोपर्यंत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावे. बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट बंद केले आहे. त्यामुळे अफवा पसरत आहेत, त्या पसरुन देऊ नका, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here