Manoj Jarange : मनोज जरांगे फॅक्टर भाजपला महागात पडला; मराठवाड्यात भोपळा

Manoj Jarange : मनोज जरांगे फॅक्टर भाजपला महागात पडला; मराठवाड्यात भोपळा

0
Manoj Jarange : मनोज जरांगे फॅक्टर भाजपला महागात पडला; मराठवाड्यात भोपळा
Manoj Jarange : मनोज जरांगे फॅक्टर भाजपला महागात पडला; मराठवाड्यात भोपळा

Manoj Jarange : नगर : लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपला (BJP) मराठवाड्यात मोठा फटका बसला. ५ वर्षांपूर्वी भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांनी यावेळी भाजपला अक्षरश: खड्यासारखा बाजूला केलं. परिणामी निवडणुकीच्या आखाड्यातील भाजपचे उमेदवार चितपट झाले. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांसारख्या दिग्गजांचा दारुण पराभव झाला. भाजपला मराठवाड्यात भोपळाही फोडता आला नाही. शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगरची एक जागा जिंकत कशीबशी आपली प्रतिष्ठा राखली. एकंदरीत ८ पैकी ७ जागा महायुतीने गमावल्या. महायुतीच्या या पराभवाला मनोज जरांगे (Manoj Jarange) फॅक्टर कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

नक्की वाचा: विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर!

ठाकरे गटालाही सहानुभूतीचा मोठा फायदा

दुसरीकडे विदर्भातही महायुतीची चांगलीच दाणादाण उडाली. १० पैकी तब्बल ८ जागांवर त्यांना पराभव स्विकारावा लागला. महायुतीच्या या पराभवाला मनोज जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. जालना, लातूर आणि नांदेड हे मतदारसंघ काँग्रेसने खेचून घेतले. ठाकरे गटालाही सहानुभूतीचा मोठा फायदा झाला. हिंगोली, परभणी आणि धाराशिव मतदारसंघात त्यांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे शरद पवार यांना देखील मतदारांनी चांगली साथ दिली. बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत भाजपला हादरा दिला.

Manoj Jarange
Manoj Jarange

हे देखील वाचा: साताऱ्यात शरद पवार गटाला ‘पिपाणी’चा फटका

मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष रंगला (Manoj Jarange)

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगेंच्या तोंडातून तुतारीचा वास येतोय, अशी भाषा कॅमेऱ्यासमोर वापरली. त्यामुळे मराठा समाजाचा आणखीच उद्रेक झाला. सोशल मीडियावर फिरण्याऱ्या पोस्टमुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा काहीसा संघर्ष रंगला. देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत जरांगेंनी गंभीर आरोप केले. पुढे हे प्रकरण थोडं शांत झालं. मात्र, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत असं पाडा की त्यांच्या पुढच्या सात पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजे, असं मनोज जरांगेंनी मराठा मतदारांना सांगितलं होतं. परिणामी निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय सामना रंगला. याच गोष्टीचा मोठा फटका महायुतीला बसल्याचं बोललं जातंय. संदिपान भुमरे यांनी जरांगेंची मनधरणी करत त्यांचा मान राखल्याने त्यांना मराठा समाजाने साथ दिली. त्यामुळे चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here