Manoj Jarange : तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते : मनोज जरांगे

Manoj Jarange : नेवासा : संत ज्ञानेश्वर (Saint Dnyaneshwar) महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासेनगरीत मराठा योद्धा मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांच्या सभेला हजारोच्या गर्दी उसळली होती.

0
Manoj Jarange : तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते : मनोज जरांगे
Manoj Jarange : तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते : मनोज जरांगे

Manoj Jarange : नेवासा : संत ज्ञानेश्वर (Saint Dnyaneshwar) महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासेनगरीत मराठा योद्धा मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांच्या सभेला हजारोच्या गर्दी उसळली होती. नेवासा नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवरा नदीच्या पुलावर समाज बांधवांच्या वतीने क्रेनद्वारे पुष्पवृष्टीने करून जंगी स्वागत करण्यात आले. सत्तर वर्षांपूर्वीच मराठा आरक्षण (Maratha Reservation) असते तर मराठा समाजातील (Maratha society) लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते. आता तो क्षण जवळ आला आहे, त्यासाठी गाफील राहू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

हे देखील वाचा : आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभर सुद्धा मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील


नेवासा शहरातील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणपती चौकात सभेच्या स्थळी आगमन होताच डॉ. मनिषा वाघ, सुशीला लोखंडे, डॉ. वैशाली घुले, अ‍ॅड. सोनल वाखुरे, सविता निपुंगे यांनी पंचारती ओवाळून जरांगे पाटलांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जरांगे पाटील यांनी अभिवादन केले. संत ज्ञानेश्वरांच्या पैस खांबाची मूर्ती भेट देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांचा गौरव करण्यात आला.
 यावेळी नेवासा तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ज्येष्ठ विधी तज्ज्ञ अ‍ॅड. के. एच.वाखुरे यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्याचा निषेध नोंदविणारा ठराव मांडला. सकल मराठा समाजाच्या वतीने भाऊसाहेब वाघ यांनी आलेल्या हजारो मराठा समाज बांधवांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी सहा वर्षीय अनामिका जरे, भक्ती शिवाजी जायगुडे, संभाजीनगर येथील व्याख्याते प्रा. बनसोड, प्रदीप दादा सोळुंके, संदीप महाराज जरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.

नक्की वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा


यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता आरक्षण प्रश्नासाठी कधी नाही असा मोठा उठाव झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव आता करोडोच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे, ही एकजूट अशीच ठेवा. विजयाचा क्षण आता जवळ आलेला आहे. त्यासाठी गाफील राहू नका. आपल्या लेकरांचे स्वप्न साकार होणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच गोरगरीब मराठयांच्या पोरांना न्याय मिळण्यासाठी ही लढाई आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here