Manoj Jarange : ‘छगन भुजबळ पनवती’ – मनोज जरांगे

'छगन भुजबळ हे पनवती असून, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल' अशा शब्दात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली आहे.

0
'छगन भुजबळ पनवती' - मनोज जरांगे

Manoj Jarange : नगर : ‘छगन भुजबळ हे पनवती असून, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल’ अशा शब्दात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या दुष्काळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. या दौऱ्यावरूनच मनोज जरांगे यांनी ही टीका केली आहे.  

नक्की वाचा : महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘पिंक रिक्षा योजना’

जरांगे म्हणाले की, “छगन भुजबळ पनवती आहे. उगाच शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. जो माणूस महापुरुषांच्या जाती काढतो, जो माणूस पायदळी कायदा तुडवतो, जो शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलतो, घटनेच्या पदावर बसून जातीमध्ये तेढ निर्माण करतो, त्यामुळे त्याने शेतात जायला नकोच. उगाच त्या शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. हा माणूस पनवती असल्यासारखा आहे. तसेच, मंत्री गेल्यावरच शेतकऱ्यांचं चांगलं होतं असे काही नाही. प्रशासन आहे ना, प्रशासनाने पंचनामे करायला पाहिजेत. हा माणूस तिथे जाऊन पंचनामे करतो का ? आणखी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांची शेती तुडवतो, असेही जरांगे म्हणालेत.

हेही वाचा : अकोलेतील उपोषण सुटले

मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहे. ज्यात, येवला तालुक्यातील कातरणी, सोमठा, निळखेडा सोबतच निफाड तालुक्यातील वेळापूर, पिंपळगाव, वनसगव, थेटाळे गावांचा समावेश आहे. या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भुजबळ पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. मात्र भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here