नगर : मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ओबीसी समाजाची भव्य सभा होत आहे. या सभेपूर्वी मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) एक मोठं वक्तव्य केले आहे. “मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) मराठा समाजातील राजकीय नेत्यांचा पाठींबा मिळत नाही. जर त्यांचा पाठींबा मिळाला तर, फक्त दोन तासांत मराठ्यांना आरक्षण मिळेल,” असा दावा मनोज जरांगे यांनी केला. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
अवश्य वाचा : ऑस्ट्रेलिया अंतिमफेरीत दाखल; भारताविरुद्ध ‘फायनल’
जरांगे पुढे म्हणाले की, “मी एकटा नाही, माझ्या सोबत 50 ते 60 टक्के मराठे म्हणजेच 6 कोटी लोकं आहे. राजकीय लोकांचा पाठींबा मिळत नाही आणि ते देणार देखील नाही. 70 वर्ष त्यांनी आमचा फक्त वापर केला. आमची तीच अडचण आहे. नेते एक होत नाही हेच आमचं दुःख आहे. पण आता आम्हाला देखील त्यांची गरज नाही. कारण आता आमचा समाजच एकवटला असल्याचं जरांगे म्हणाले.
अवश्य वाचा : मनोज जरांगेची मोठी घोषणा ; २४ डिसेंबरनंतर ‘या’ ठिकाणी आंदोलन सुरु
मुस्लीम, धनगर आणि बंजारा समाजाचे शिष्टमंडळ देखील माझ्या भेटीसाठी आले होते. धनगर आणि मराठा समाज एकत्र असून, आम्ही एकमेकांना पाठींबा दिला आहे. मुस्लीम आणि बंजारा समाजाचे देखील तेच म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही सर्व चार लहान-मोठे भाऊ एकत्र झाल्यावर सरकारचे काय होणार, यावर त्यांनी विचार करावा, असं जरांगे म्हणाले.