नगर : ‘सरकारचं आता भागलं आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये काहीच दिलं नाही.उलट लाडक्या बहिणींना अपात्रतेच्या नावाखाली योजनेतून काढलं जात आहे’,अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी केली. राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2025) काल (ता.१०) सादर करण्यात आला. सरकार बजेटमध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये (Ladki Bahin Yojana) देण्याची घोषणा करेल,असं सांगितलं जात होतं.मात्र,सरकारने कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला आहे. या मुद्द्यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
नक्की वाचा : आता जेजुरीतील खंडेरायाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड लागू!
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही. कर्जमाफी नाही आणि कर्जमुक्तीही नाही. गोरगरिबांच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी काढला नाही. म्हणजे किती गोड बोलून मान कापली जाते. त्यामुळे इथून पुढे सांगायचं कमी, बोलायचं कमी आणि अचानक आंदोलन करायचे, या भूमिकेशिवाय सरकार आता ठिकाणावर येणार नाही,असा इशारा जरांगे यांनी दिला.
अवश्य वाचा : मोठी बातमी!आनंदाचा शिधा योजना अखेर बंद
‘सरकार निवडून येईपर्यंत बहिणींच्या पाया पडत होत’ (Manoj Jarange)

सरकार निवडून येईपर्यंत किती पाया पडत होतं. किती लाडक्या बहिणींना पैसे दिले.अगदी तिसऱ्या तळात राहणाऱ्या लाडक्या बहिणीला सुद्धा पैसे दिले. मग आज का या लाडक्या बहिणींना बाहेर काढायला लागले? याचा अर्थ त्यांचा आता भागलंय. त्यामुळे त्यांना आता फक्त गोड बोलायचं. मात्र करायला चुकायचं नाही. त्यांच्याकडे जसा कावा आहे, तसा गोरगरिबांकडे सुद्धा आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. एक मार्ग म्हणजे सरकार गोरगरिबांना कळू देत नाही. शेवटी बहीण ही बहीण असते. त्यामुळे तिला का बाहेर काढलं? असा सवाल त्यांनी केला.
‘तुम्ही जातीयवादी आहात’ (Manoj Jarange)
जरांगे पुढे म्हणाले की, मी आरक्षण मागतोय म्हणजे मला विनाकारण जातीवादी ठरवू नका. तुम्ही मागितलं त्यावेळी आम्ही तुम्हाला जातीवादी म्हटलं नाही. फक्त गरिबांच्या लेकरासाठी आरक्षण लागतं म्हणून मागत आहे. तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करताय म्हणजे तुम्ही जातीवादी आहात,असा हल्लाच मनोज जरांगे यांनी चढवला.