Chhagan Bhujbal : ‘मनोज जरांगे मारुतीचं शेपूट; तो शांत बसणार नाही’: छगन भुजबळ

मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे. तो शांत बसणार नाही. गाडी ताब्यात घा, निवडणूका घेऊ नका असं म्हणत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी केला.

0
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नगर : मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे. तो शांत बसणार नाही. गाडी ताब्यात घा, निवडणूका घेऊ नका असं म्हणत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी केला. मुंबईमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर हे टीकास्त्र सोडलं. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) द्या,अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. तर ओबीसींना स्वतंत्र आरक्षण द्या,असे भुजबळांचं म्हणणं आहे. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दिक फैरी झडत आहेत.

नक्की वाचा : सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी  

श्रेय वादासाठी स्वतः:हुन हे उपोषणाला जाऊन बसले – छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)

मनोज जरांगेना काही कळत नाही. विनाकारण गाव बंद करा म्हणतात. वयस्कर लोकांना उपोषणाला बसवताय, त्यांना काही झाले तर काय करायचं ? सर्व बाबतीत सरकार सकारात्मक विचार करत आहे. परंतु गैरसमज निर्माण करताय. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते वाटेल ते बोलतात. १० तारखेला उपोषणाबाबत समाजातील लोकांना विचारले नव्हते, श्रेय वादासाठी स्वतः:हुन हे उपोषणाला जाऊन बसले, असा आरोप भुजबळांनी यावेळी केला.

अवश्य वाचा : ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ लवकरच चित्रपटगृहात  

भुजबळ म्हणाले की, सरसकट आरक्षण देता येणार नाही, सगेसोयरे हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही. कोर्टात याला विरोध होणार आहे. जर वयस्कर लोकांच्या जीवाला काही झाले तर पोलिसांनी जरांगे यांना कारणीभूत धरावे. बारावी परीक्षा सुरू आहेत, हे रस्ते बंद करतात. त्यांना जनतेसाठी काही वाटत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे रस्त्यावर उतरायला सांगतात. १० तारखेला उपोषणाला बसले होते, त्यावेळी कोणताही विचार समाजाला घेऊन जरांगे यांनी केला होता का ? सगेसोयरे हा शब्द कायद्यात बसत नाही. एखाद्याचे वडील शेड्युल कास्ट असतील तर प्रमाणपत्र त्यांना मिळेल ? असे भुजबळ म्हणाले.

अजय बारस्करांबद्दल यांच्या बद्दल काय म्हणाले ? (Chhagan Bhujbal)

बारस्कर यांची व्हायरल क्लिप मी पाहीली होती. त्यांना धरून विधानसभेत बोललो. ते २००६ पासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढताय, ते जरांगे सोबत असायचे. त्यांच्या गुप्त बैठक, बेताल वक्तव्ये याला कंटाळून ते बोलत आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here