Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ते महाराष्ट्राचा दौरा करतील.

0

नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे (Manoj jarange) हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ते महाराष्ट्राचा दौरा करतील. त्यांच्या या दौऱ्याला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. 

नक्की वाचा : आरक्षणावरून मनोज जरांगेंनी केलं सर्वात मोठं विधान

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचा वेळापत्रक जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात केलेल्या दौऱ्यात त्यांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले होते. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यात जरांगे हे आपल्या सभांमधून काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा : नाना पाटेकरांच्या ‘जर्नी’च्या शूटिंगला सुरुवात

मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे. एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे. त्यामुळे आता त्यांच्या या दौऱ्याचा  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी फायदा होणार का हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल .