नगर : सरकारने विशेष अधिवेशन बाेलावून मराठा समाजाला (Maratha community) सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. आम्ही जाहीरपणे सांगताे, आम्ही अर्धवट मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेणार नाही, असा मनाेज जरांगे (Manoj Jarange) पाटलांना थेट सरकारला संदेश दिला आहे.
हे देखील वाचा : नेत्यांच्या फोटोला जोडे मारुन फासले काळे
अंतरवाली सराटी येथून ते माध्यमांशी बाेलत हाेते. जरांगे पाटील म्हणाले, ”मराठा समाजाचा व्यवसाय शेती आहे. शेतीनुसार आरक्षण द्या. मराठा आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बाेलवा, अर्धवट आरक्षण आम्हाला मान्य नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने साेडवा.
नक्की वाचा : आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम काेर्टाचे कठाेर पाऊल; ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश
शेती शब्दाची लाज वाटण्याइतके मराठे खालच्या विचाराचे नाही. शेती आधारे जाती निर्माण झाल्या आहे. यापूर्वीच ६० टक्के मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. ज्यांना आरक्षण घ्यायचे ते घेतील. सरकारची विशेष अधिवेशन घेण्याची तयारी दिसत आहे. आत्महत्या काेणीही करू नये, पाणी पिल्यापासून मराठे शांत झाले आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी कायम राहणार आहे. राजीनामा देणाऱ्या आमदार-खासदारांचे याेगदान समाज विसरणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत आमदार-खासदारांनी आवाज उठवावा. मराठा आरक्षणाची लढाई आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही.
दरम्यान, जरांगे पाटील म्हणाले, ”मराठा आमदार आणि खासदारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन किती फायदा होईल, ते मला माहिती नाही. मात्र, आता मराठा आमदार आणि खासदारांनी गप्प बसू नये. सगळे मराठा आमदार आणि खासदारांनी मुंबईतच थांबावे. सत्ताधारी आणि विरोधी गटात असलेल्या सर्व आमदारांनी आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारचा पिच्छा सोडू नये. तिकडेच सरकारला धरुन बसा. इकडे आम्ही उपोषणावरुन मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या सर्व आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री या सगळ्यांना मिळून एक मोठा गट तयार करावा. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. मंत्रालय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दाराबाहेर बसून आरक्षणासाठी सतत पाठपुरावा करा आणि हा विषय मार्गी लावा. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला तर मराठा समाजा तुम्हाला कधीही विसरणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ते मंगळवारी अंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आज सकाळीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पाणी प्यायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.