Manoj Jarange : क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis)आहे. माझ्या समाजाचा नुसता वापर केला,असा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर (Prashant koratkar) हा गेल्या २५ दिवसांपासून फरार आहे. यावरून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
नक्की वाचा : ‘मी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं’-अजित पवार
‘तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही’ (Manoj Jarange)
मनोज जरांगे पाटील म्हणाले की,सरकारचा सोयरा आहे ना तो. त्याच्यामुळे तो सापडणार नाही. बाकीचे असते तर कशात तरी आतमध्ये टाकले असते. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेवढ्या मकोकासारख्या कलमा आहेत, तेवढ्या कलमा त्याच्यावर टाकल्या पाहिजेत. तुम्हाला जर खरंच छत्रपतींचे प्रेम आहे ना, हिंदूतले काही जण रोज छत्रपतींचा अवमान करत आहे. त्यांनी फक्त आमचा वापर भांडण्यासाठी केलाय आणि त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नकोही, आम्हाला छत्रपतींचा हिंदुत्व मान्य आहे. आता फक्त निषेध करून चालणार नाही, महापुरुषांवर बोलणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल,असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केलाय.
अवश्य वाचा : आयपीएलचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबीत रंगणार!
‘देवेंद्र फडणवीस फक्त गोरगरिबाच्या लेकरांचं वाटोळं करू शकतात’ (Manoj Jarange)
जरांगे पुढे म्हणाले की, प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडत नाही, हे पोलिसांचे अपयश नाही, देवेंद्र फडणवीस घडवून आणत आहेत. अपमान करणारे सगळे त्यांचे सोयरे आहेत. त्यांनी एक टोळी तयार केली आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा अपमान करते. ते फक्त दाखवायला हिंदू दाखवतात. त्यांना बळ कोण देतं? त्यांना बोलायचं कोण सांगतं? देवेंद्र फडणवीस फक्त गोरगरिबाच्या लेकरांचं वाटोळं करू शकतात. त्यांनी काही जण फक्त जाणून-बुजून अवमान करण्यासाठी ठेवले आहेत. आता आम्हाला कळले की, मागील सत्तर वर्ष त्यांनी आमचा वापर फक्त भांडणासाठीच केला आहे. आम्ही जर हिंदू आहे तर आम्हाला मोठं कधी करणार आहे? हिंदू-हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस करायचा आहे? धर्माचे रक्षण करणारी जात मराठा आहे, तुम्ही तिला संपवायला लागलात,अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.