Manoj Jarange:’छगन भुजबळांच्या नादात फडणवीस सत्ता घालवून बसणार’-मनोज जरांगे 

0
Manoj Jarange
Manoj Jarange

नगर : ‘छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) नादात देवेंद्र फडणवीस सत्ता घालवून बसणार’ असल्याचे मत मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. पाडायचे की उभे करायचे ते ठरवू, पण तुमचा कार्यक्रम आम्ही करु असेही जरांगे पाटील म्हणाले. दरेकर हे लय खवाट, डेंजर भूत आहे. हे त्रासलेलं मराठा द्वेषाच भूत मराठा संघटना फोडण्याचे काम करतयं. मराठ्यांची शक्ती काय असते ते आम्ही दाखवू थोडा संयम दाखवा,असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा : आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू’-संजय राऊत

‘यांना आता खुर्चीत ठेवायचं नाही’ (Manoj Jarange)

राज्य सरकारने पक्क ठरवलं आहे की, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळं मराठ्यांनी देखील ठरवलं आहे की, यांना आता खुर्चीत ठेवायचं नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आम्ही सरकारला आणखी २९ तारखेपर्यंत वेळ दिला आहे. मराठा समाजामध्ये या सरकारविषयी प्रचंड चीड आहे. त्यांची खदखद बाहेर पडणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे

तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हाला राजकीय भाषा वापरावी लागेल. मंत्री शंभुराज देसाई आले त्यावेळी शेवटची चर्चा झाली. त्यानंतर सरकारशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मनोज जरांगे म्हणालेत. आमचा जीव आरक्षणात त्यांचा जीव खुर्चीत, त्यांची खुर्ची आम्ही घालवणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. काय व्हायचं ते होऊद्या, असेही जरांगे पाटील म्हणाले. फडणवीसांना आणखी किती दिवस मराठ्यांना वेठीस धरायचे आहे ते बघू, असेही जरांगे पाटील म्हणाले.

अवश्य वाचा : ‘डम डम डम डम डमरू वाजे’ गाण्याचं ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये रिक्रिएशन

‘२९ ऑगस्टला कोणाला पाडायचं की निवडून आणायचं हे ठरवू’ (Manoj Jarange)

‘२९ ऑगस्टला कोणाला पाडायचं की निवडून आणायचं हे ठरवू’  २९ ऑगस्टला आम्ही कोणाला पाडायचं की निवडून आणायचं? याबाबतचा निर्णय घेणार आहोत. सर्व समाजाशी चर्चा करुन हा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे म्हणालेत. दरम्यान, मराठा समाजातील इच्छुकांनी आपापली कागदपत्रे काढून ठेवावीत असे जरांगे पाटील म्हणालेत. दरम्यान, यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. त्यामुळं आता आम्ही त्यांची खुर्ची घालवणार अल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here